बुद्ध आले जन्मास
वैशाखी पुनवेला घडला ऐसा हा इतिहास
विश्वतारण्या महान मानव बुद्ध आले जन्मास
प्रभात वेळी वनी लुंबिनी महामाया क्षण भर थांबूणी
शांती सुखाचे या अवनिवर जीवन ये उदियासे
शाल वृक्षाचा मोहर तो पडता फांदीला त्या धरून ओढता
निसर्गाच्या हवेत भरला धुंद नवा सुवास
प्रसूतीच्या होता वेदना, आखली मनी सौख्य साधना
पुत्र जन्मता हा तिला भासे जणू तिचे आकाश