गीत – शांता शेळके
स्वर – पं. हृदयनाथ मंगेशकर
संगीत – आनंदघन
चित्रपट – मराठा तितुका मेळवावा
शूर अम्ही सरदार अम्हाला
काय कुनाची भीती ?
शूर अम्ही सरदार अम्हाला
काय कुनाची भीती ?
देव, देश अन् धर्मापायी
प्रान घेतलं हाती !
शूर अम्ही सरदार अम्हाला
काय कुनाची भीती ?
आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत
आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत
तलवारीशी लगीन लागलं जडली येडी प्रीत
लाख संकटं झेलुन घेईल अशी पहाडी छाती !
शूर अम्ही सरदार अम्हाला
काय कुनाची भीती ?
जिंकावे वा कटुन मरावं हेच अम्हाला ठावं
जिंकावे वा कटुन मरावं हेच अम्हाला ठावं
लढुन मरावं, मरुन जगावं हेच अम्हाला ठावं
देशापायी सारी इसरू माया-ममता-नाती!
देव, देश अन् धर्मापायी
प्रान घेतलं हाती !
शूर अम्ही सरदार अम्हाला
काय कुनाची भीती ?
Note: All song lyrics published on this website belong to their respective copyright owners. We do not claim any ownership over the content and share it strictly for informational and educational purposes.


