शिलवान भारी गुणवान | Shilvan Bhari Gunvan Song Lyrics

शिलवान भारी गुणवान,
विद्या पती जिचा धनवान..2
नटविला सोन्यान तो संसार भिमाचा रमान..2

शिलवान भारी गुणवान,
विद्या पती जिचा धनवान..2
नटविला सोन्यान तो संसार भिमाचा रमान..2

भल्या पहाटे उठुन शेणी गौर्या थापून,
राख पोळीचा वेचून पै पैका जमवून..2
श्रमान बहु श्रमान..2
नटविला सोन्यान तो संसार भिमाचा रमान….।। 1 ।।

गळी ते काळ मणी गं,
भाळी कुंकु लेवुनी,
सुख दुःखात रमा ती नित्य राही आनंदुनी..2
प्रेमान अती प्रेमान ..2
नटविला सोन्यान तो संसार भिमाचा रमान….।। 2 ।।

उच्च शिक्षणासाठी जाता, परदेशी धनी,
घरी उपाशी रमाई, झुरली धन्यासाठी मनी..2
नेमान नित्य नेमान..2
नटविला सोन्यान तो संसार भिमाचा रमान….।। 3 ।।

प्रज्ञा सूर्या भिमराया रमाईची साऊली,
प्रभाकरा दलितांची रमा ठरली माऊली..2
जोमान तिन जोमान,
जोमान लय जोमान….2
नटविला सोन्यान तो संसार भिमाचा रमान….।। 4 ।।

शिलवान भारी गुणवान,
विद्या पती जिचा धनवान..2
नटविला सोन्यान तो संसार भिमाचा रमान……….

 

Note: All song lyrics published on this website belong to their respective copyright owners. We do not claim any ownership over the content and share it strictly for informational and educational purposes.