गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य योजना

माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेमध्ये वरचा क्रमांक मिळविणाऱ्या गुणवान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत आर्थिक अडचणींमुळे बाधा पोहोचू नये म्हणून आणि त्यांची गुणवत्ता वाढविणे शक्य व्हावे व त्यायोगे त्यांच्या बुद्धिमत्तेचा फायदा समाजास व राज्यास व्हावा यासाठी अशा विद्यार्थांना पुढील आर्थिक सहाय्य देण्यासाठी ही योजना शासन राबवीत आहे. ह्या योजनेमधून एकूण आठ विभागांतून एकूण १२० विद्यार्थ्यांना ह्या सवलतीचा लाभ देण्यात येतो. या योजनेखाली शासनमान्य व अनुदानित महाविद्यालयांमध्ये आकारला जाणाऱ्या प्रवेश फी, शिक्षण फी, ग्रंथालय फी, जिमखाना फी व परीक्षा फी इ. ची प्रतिपूर्ती केली जाते. तसेच विद्यार्थी वसतिगृह असेलच, तर वसतिगृह फी प्रत्येक सत्रासाठी रुपये ३००, भोजन खर्च रुपये १५० दरमहा तसेच वैद्यकीय खर्चापैकी प्रत्यक्ष खर्च किंवा रुपये १२० यापैकी जि रक्कम कमी असेल, तेवढी रक्कम तसेच पुस्तकांसाठी सहाय्य दिले जाते. कनिष्ठ व वरिष्ठस्तर मिळून एकूण २०८ संच मंजूर आहेत.
Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?