पंचशीलाची तत्त्वप्रणाली विश्व जीवनोद्धार
अनुसरा बुद्धाचे सुविचार
पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि ||
जीवहिंसेपासुनी अलिप्त राहण्याची मी प्रतिज्ञा करितो
दया क्षमा शांती प्रेमाने
मानवसेवा नित्य मी करितो
त्यजुनि अत्याचार
अनुसरा बुद्धाचे सुविचार
अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि ||
चोरी करण्यापासुनी अलिप्त राहण्याची मी प्रतिज्ञा करितो
दुर्बुद्धी दुर्गूण त्यजुनी
सद्गुण सुबुद्धी मी आचरितो
जयामुळे उद्धार
अनुसरा बुद्धाचे सुविचार
कामेसुमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामी ||
अनाचारापासुनी अलिप्त राहण्याची मी प्रतिज्ञा करितो
कामवासना पाप त्यजुनी
भला मार्ग पुण्याचा धरितो
सोडुनिया अविचार
अनुसरा बुद्धाचे सुविचार
मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि ||
खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची मी प्रतिज्ञा करितो
सदधम्माचे सत्यवचन
अंगीकारुनी सत्यची वदतो
हाचि घडो आविष्कार
अनुसरा बुद्धाचे सुविचार
सुरामेरयमज्ज पमादट्ठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि||
मद्यसेवनापासून अलिप्त राहण्याची मी प्रतिज्ञा करितो
मादक मोहक जीवननाशक
वस्तूंचा धिःकार मी करतो
करुनिया निर्धार
अनुसरा बुद्धाचे सुविचार
शब्दरचना:
गायक: कृष्णा शिंदे
“दीक्षाभूमी ते चैत्यभूमी”