| श्रेणी | माहिती |
|---|---|
| गीताचे नाव | नऊकोटी या दिनांना |
| गायक (Singer) | आनंद शिंदे (Anand Shinde) |
| गीतकार (Lyricist) | एकनाथ माळी (Eknath Mali) |
| संगीतकार (Music Director) | हर्षद शिंदे (Harshad Shinde) |
| आलबम (Album) | भीमगीत / Bhimgeet |
प्रेमान प्रेमान…
धरल छातीशी भिमान …2
नऊकोटी या दिनांना घेतल ओटीत रमान,
नऊकोटी या लेकरांना घेतल ओटीत रमान…
नऊकोटी या दिनांना घेतल ओटीत रमान,
नऊकोटी या लेकरांना घेतल ओटीत रमान…2
माता पित्यांच जोडूनी नात,
शिरी मायेचा फीरवुनी हात…2
कधी केला न हेवादावा,
जपल त्यांना दिवसरात…2
माया लावली सर्वांना
त्यान माऊली समान,
नऊकोटी या लेकरांना घेतल ओटीत रमान,
नऊकोटी या दिनांना घेतल ओटीत रमान,
नऊकोटी या लेकरांना घेतल ओटीत रमान…।।1।।
जाती वादाचा वादळ वारा,
जीर्ण रुढीच्या लाटांचा मारा…2 नव्हता दीनजणांना थारा बाबाभिमान दीला सहारा…2
त्यान रखील इमान,
कधी झाला न बैमान…2
नऊकोटी या लेकरांना घेतल ओटीत रमान,
नऊकोटी या दिनांना घेतल ओटीत रमान,
नऊकोटी या लेकरांना घेतल ओटीत रमान…।।2।।
जातीयतेचा उपटून मुळ,
अपल भीमान दावल बळ…2 गरबांचा पाहून छळ
खुल केल चवदार तळ…2
त्या म्हाडाच्या मैदानी
केली लढाई जोमान…2
नऊकोटी या लेकरांना घेतल ओटीत रमान,
नऊकोटी या दिनांना घेतल ओटीत रमान,
नऊकोटी या लेकरांना घेतल ओटीत रमान…।।3।।
भिमासारखा दयाळू पीता, रमासारखी मायाळू माता…2
खर सांगतो मी एकनाथा
नाही कधीच होणार आता…2
आज माणूस म्हणून
जो मिळतोय सन्मान…2
नऊकोटी या लेकरांना घेतल ओटीत रमान,
नऊकोटी या दिनांना घेतल ओटीत रमान,
नऊकोटी या लेकरांना घेतल ओटीत रमान…।।4।।
प्रेमान प्रेमान,
धरल छातीशी भिमान ..
अग प्रेमान प्रेमान,
धरल छातीशी भिमान…
नऊकोटी या दिनांना घेतल ओटीत रमान,
नऊकोटी या लेकरांना घेतल ओटीत रमान….


