उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रम (DMER) शिकणाऱ्या अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती 2023-24

योजनेचा उद्देश

होतकरु व गरिब विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करता यावे
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे तसेच त्यांना शिक्षणाबद्दल रुची निर्माण करणे
शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करणे.
विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी देणे.

शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे.
उच्च शिक्षणासाठी आवड निर्माण करणे.

विद्यार्थ्यांना कुठल्याच आर्थिक अडचणींशिवाय स्वतःचे शिक्षण पूर्ण करता यावे.
कुटुंबाला आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या चिंतेपासून मुक्तता करणे.
विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी देणे.

योजनेचे वैशिष्ट्य

राज्यातील विद्यार्थ्याना विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळावे या उद्देशाने सुरु करण्यात आलेली महत्वपूर्ण अशी हि योजना आहे.
विद्यार्थी घरी बसून स्वतःच्या मोबाईल च्या सहाय्याने या योजनेसाठी अर्ज करून लाभ मिळवू शकतो त्यामुळे त्याला कुठल्याच शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही.

आवश्यक कागदपत्रे

अर्जदाराचे आधार कार्ड
अर्जदाराचे रेशन कार्ड
रहिवाशी दाखला
अधिवास प्रमाणपत्र
विद्यार्थी पॅन कार्ड (पर्यायी)
वडिलांचे पॅन कार्ड
आईचे पॅन कार्ड (पर्यायी)
वडिलांचे आधार कार्ड
उत्पन्न प्रमाणपत्र – सक्षम प्राधिकरणाकडून जारी केलेले असावे.
शाळा सोडल्याचा दाखला
नवीन अर्जदारांना बारावीची आणि दहावीची गुणपत्रिका सादर करणे आवश्यक आहे. (नूतनीकरणासाठी लागू नाही)
उत्पन्न प्रमाणपत्र / शपथपत्रात स्पष्टपणे नमूद केलेले असावे की उमेदवार अल्पसंख्यांक समुदायाशी संबंधित आहे.
आईचे आधार कार्ड (पर्यायी)
जर उमेदवार महाराष्ट्राबाहेर शिकत असेल तर :
संबंधित संस्था / प्राधिकरण मान्यताप्राप्त असल्याचे पत्र
एफआरए प्रत
चालू शैक्षणिक वर्षासाठी बोनफाइड प्रमाणपत्र