५ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

मागासवर्गीय समाजातील ज्या विद्यार्थिनी मुली आहेत त्यांच्या शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी ही योजना आहे. पैसे अभावी किंवा इतर आर्थिक उत्पन्न कमी असल्यामुळे ज्या मुली शिक्षण घेऊ शकत नाहीत, ज्या मुली शाळेत जाऊ शकत नाहीत अशा मुलींसाठी ही योजना महाराष्ट्र राज्य शासनाच्या तर्फे लागू करण्यात आलेले आहे. तरी या योजनेमुळे अनेक मुलींना फायदा होईल सहसा समाजामध्ये मुलगी झाल्याने मुलीला दुय्यम स्थान देण्याचे अनेक प्रकार उघडकीस आलेले आहेत त्याला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुलींच्या शिक्षणाचा खर्च या योजनेमधून करण्याचे ठरवलेले आहे.

योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव –
विमुक्त जाती व भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग.

योजनेचा उद्देश –
शासन निर्णय दिनांक १२ जानेवारी, १९९६ अन्वये मागास समाजातील विद्यार्थिनींसाठी व शासन निर्णय दिनांक २९ ऑक्टोबर, १९९६ पासून विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थींनींना सुध्दा लागू करण्यात आली आहे. सदर प्रवर्गाच्या विद्यार्थींनींचे गळतीचे प्रमाण कमी करण्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ही शिष्यवृत्ती दिली जाते.

योजनेच्या प्रमुख अटी
विद्यार्थीनी विजाभज / विमाप्र या प्रवर्गातील असावी.
विद्यार्थीनी इ. ५ वी ते ७ वी मध्ये शिकणारी असावी.
विद्यार्थीनी ही शासन मान्य शाळेत नियमित शिकणारी असावी.

योजनेचे स्वरुप –
इयत्ता ५ वी ते ७ वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इ. ८ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने अनुक्रमे सन १९९६ व २००३ पासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे. इयत्ता, शिष्यवृत्ती दर व कालावधी.

५ वी ते ७ वी दरमहा ६० रुपये प्रमाणे १० महिन्याचे ६०० रुपये.
८ वी ते १० दरमहा १०० रुपये प्रमाणे १० महिन्याचे १००० रुपये अदा केले जातात.

नियम, अटी व पात्रता इ. :
उत्पन्न व गुणाची अट नाही.
संबंधित शाळेच्या मुख्याणद्यापकांनी विद्यार्थ्यांबचे अर्ज ऑनलाईन भरणे आवश्येक.
७५% उपस्थिती असल्यास शाळेने प्रस्ताव विहीत कालावधीत सादर करावा.
लाभधारक मुलगी शासनमान्य शिक्षण संस्थेत नियमित शिकत असावी. सदर शिष्यवृत्तीची रक्कम त्या त्या मुलींच्या बँकेतील खात्यामध्ये/ ऑनलाईन जमा करण्याषत येते.

दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप
प्रति विद्यार्थीनीस दरमाह रुपये ६०/- याप्रमाणे १० महिन्या करीता रु.६००/- शिष्यवृत्तीची रक्कम संबंधीत लाभार्थ्यांस अदा केली जाते.

अर्ज करण्याची पध्दत
सदर योजनेचे संगणकीकरण झालेले असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी https://mahaeschol.maharashtra.gov.in या वेबसाईटवर या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थिनींचे अर्ज / माहिती भरुन संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे सादर करावेत.

संपर्क कार्यालयाचे नाव
संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद.
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/ उपनगर.
संबंधित शाळांचे मुख्याध्यापक.