| घटक | तपशील |
|---|---|
| गीताचे नाव | बुद्ध, कबीर, जोतीबा (Buddha, Kabir, Jyotiba) |
| गायक | आनंद शिंदे (Anand Shinde) |
| गीतकार | एकनाथ माळी (Eknath Maali) |
| संगीतकार | हर्षद शिंदे (Harshad Shinde) |
| अल्बम | धर्मांतर अल्बम (Dharmantar Album) |
बुद्ध कबीर जोतीबा
झाले महान भूवर
त्यात भीमराव माझा, जशी दुधात साखर
शोध सत्याचा लाविला
त्या गौतम बुद्धानं
केला धम्माचा पाठ
आंबेडकर बाबानं
धर्म बुद्धाचा हा थोर
जसं दूध असे कोरं
त्यात भीमराव माझा, जशी दुधात साखर
गरिबांचा जोतिबा
जगी झाला महात्मा
त्या दुःखी दलितांचा
त्यानं जाणिला आत्मा
भोळ्या जनतेवर त्याचे
आहे असंख्य उपकार
त्यात भीमराव माझा, जशी दुधात साखर
त्या कबीराची वाणी
आजही घुमते कानी
केली लोकांची सेवा
त्यांनी आपल्या ढंगानी
दोहे तयाचे जगभर
करती सत्याचा प्रचार
त्यात भीमराव माझा, जशी दुधात साखर
युगपुरुष महान
गोरगरिबांचे साथी
हिरे माणिक ठोकरले
जोडली दीनांशी नाती
त्यांनी नेलं समाजाला
प्रगतीच्या पथावर
त्यात भीमराव माझा, जशी दुधात साखर
बुद्ध कबीर जोतीबा
झाले महान भूवर
त्यात भीमराव माझा, जशी दुधात साखर


