कित्येक शतकापासुन भारतीय जनतेला जळुप्रमाणे चिकटलेली मायावी ब्राह्मणशाही यावर वज्रप्रहार करणारे, अज्ञान व अंधश्रद्धेच्या खाईतून बाहेर काढून करोडों शोषित, पिडीत, शुद्रातिशुद्र, बहुजन समाजातील स्त्री -पुरूषांना शिक्षणाची कवाडे खुली करून देणारे, सत्यशोधक समाजाची स्थापणा करून ब्राह्मणशाही चे ऑपरेशन करून वैज्ञानिक प्रक्रिया आरंभ करणारे, स्त्री शिक्षणाचे जनक, छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती साजरी करणारे , डॉ. बाबांसाहेबांचे गुरु ,
बहुजनांचे प्रणेता, मार्गदर्शक, सामाजिक क्रांतीचे पितामह , क्रांतीसुर्य महात्मा फुले !
महात्मा जोतीबा फुले यांनी १८४८ साली देशातील पहिली मुलींसाठी शाळा सुरु केली . १८५२ साली बहुजन मुलांसाठी शाळा सुरु केली . महात्मा फुले हेच भारतीय शिक्षणाचे आद्याजनक आहेत हे निर्विवाद सत्य आहे . महात्मा फुले यांनी शाळा सुरु करण्यापूर्वी या देशात बहुजनांसाठी कोणीही शाळा सुरु केली नाही . राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्यामुळेच भारतीयांना शिक्षणाची संधी मिळाली . शिक्षणाचे महत्व सांगणारे अत्यंत हृदयस्पर्शी विचार भारतात प्रथम महात्मा फुले यांनी मांडले .
शिक्षणाअभावी देशातील बहुजनांची कशी वाईट अवस्था झालेली आहे याचे विदारक चित्र प्रथम महात्मा फुले यांनी मांडले आणि एका वर्षातच २० शाळा सुरु केल्या .
शिक्षणापासून वंचीत ठेवाण्यासाठी सनातनी लोकांनी अनेक कपटकारस्थाने केली अनेक ग्रंथाद्वारे बहुजनांच्या व स्त्रियांच्या शिक्षणावर बंदी घातली . हजारो वर्षांची ही बंदी मोडून महात्मा फुले यांनी बहुजनंना शिक्षणाची दालने खुली केलीत.
राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी सामाजिक परिवर्तानासाठी शाळा सुरु केली पण शाळा सुरु करण्यास मनुवादी समर्थक लोकांचा कड़क विरोध होता त्यामुळे शिक्षक मिळणे देखील शक्य नव्हते . तेंव्हा त्यांनी स्वतः हातात खडू घेउन मुलांना शिकविले . पुढे त्यांनी सावित्रीमाईंना प्रशिक्षित शिक्षिका घडवले . अत्यंत तळमळीने शिकविनाऱ्या महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांना कोणीही वेतन दिले नाही . गोर-गरीब, अस्पृश्य, अनाथ, भुकेलेल्या मुलांना स्वतः गोळा करून त्यांनी मोफत शिकविले . यासाठी त्या काळात त्यांना कोणीही अनुदान दिले नाही . त्यांनी गोर-गरिबांना मोफत पण आनंदाने शिकविले.
राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी हंटर आयोगाला प्राथमिक शिक्षक सक्तीचे आणि मोफत करण्यासाठी भाग पाडले .
भारतीयांना शिक्षण देण्यासाठी इंग्रज सरकारने १८८२ साली सर विल्यम हंटर यांचे अध्यक्षतेखाली भारतीय शिक्षक आयोग निर्माण केला यालाच हंटर आयोग असे म्हणतात.
१९ ओक्टोबर १८८२ रोजी राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी हंटर यांची भेट घेतली व एक निवेदन दिले . त्यामध्ये महात्मा फुले म्हणतात की बहुजनांच्या मुलांना वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत द्यावे. सरकारला मिळणांरा महसूल बहुजनांचा आहे या महसुलावर उच्चवर्णीय लोक शिक्षण घेतात पण बहुजनांना शिक्षण घेण्यास विरोध करतात हे कटुसत्य महात्मा फुले यांनी हंटर आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. गोर-गरीब, कष्टकारी, कामकारी,शेतकरी,यांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी इंग्रज सरकारला महात्मा फुले यांनी भाग पाडले .
महात्मा फुले यांनी रात्रं दिन अखंड श्रम करून पैसा उभा केला . ते नामवंत बांधकाम तज्ञ होते . त्यांनी खडकवासला धरण, कात्रज घाट, पुण्यातील अनेक पुल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल(मुंबई)इ. बांधकामे केली . त्यातून मिळालेल्या पैश्यातुन बहुजनांसाठी शाळा काढल्या. त्यांनी स्वतःचा विचार केला असता तर खूप श्रीमंत झाले असते. पण त्यांनी संपूर्ण पैसा गरीब बहुजनांच्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी खर्च केला. व्यक्तिगत हित, हौस, सुख दूर सारून महात्मा फुले आणि त्यांच्या सौभाग्यवती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी बहुजनांच्या मुला मुलींना शिक्षण देण्यासाठी शाळा सुरु केल्या . बहुजनांना शिक्षण मिळाल्याशिवाय हजारो वर्षांची गुलामगिरी संपणार नाही यासाठी महात्मा फुले यांनी स्वखार्चाने शाळा सुरु केल्या .
असा हा बहुजनांचा सुर्य गुरूवार दिनांक २८ नोव्हेंबर १८९० रोजी अस्त पावला. मृत्यूसमयी महात्मा फुले ६३ वर्षाचे होते.