बलिदानाचे कफन बांधुनी झिजला तू भीमराया
मायपित्याहून उदंड केलीस अमुच्यावरती माया
अन्यायाची चीड घेऊनी पेटवली तू धूळ
धुळीतून त्या तयार झाले लाख लाख हे लाल
अन्यायाच्या पुढे कधी ना झुकेल त्याची छाया
बलिदानाचे कफन बांधुनी झिजला तू भीमराया
लाख जीवांच्या धगधगणाऱ्या घेऊन सवे मशाली
जुन्या रूढींशी मांडलीस तू जन्ममृत्यूची खेळी
लाचारीतून दलितांची ना जगेल आता काया
बलिदानाचे कफन बांधुनी झिजला तू भीमराया
बहुजन हिताय बहुजन सुखाय तू सम्यक दृष्टीचा
तथागतांचा अनुयायी तू पुत्र जरी क्रांतीचा
येशील का रे पुन्हा कधी तू आम्हास दर्शन द्याया
बलिदानाचे कफन बांधुनी झिजला तू भीमराया