अग हे दान दिलय ग भीमानं | Aga He Dan Dilay Ga Bhiman Song Lyrics

जाऊ जोडीने येऊ ग पाहून , जाऊ जोडीने येऊ ग पाहून
अशी दीक्षा भूमीची शान, अशी दीक्षा भूमीची शान

अग हे दान दिलय ग भीमानं,
अग हे दान दिलय ग भीमानं
दीक्षा बुद्धाची देऊन
अग हे दान दिलय ग भीमानं दीक्षा बुद्धाची देऊन।। धृ ।।

दरवर्षाला सण हा येतो दसरा अन ती दिवाळी
फार दुरुनी येति पाहण्या लाखो दलित मंडळी
असं केलंय कार्य महान , असं केलंय कार्य महान

दीक्षा बुद्धाची देऊन
अग हे दान दिलय ग भीमानं दीक्षा बुद्धाची देऊन।। 1 ।।

लाखमोलाचा होता माझा ज्ञानिवांत भीमराया
त्याच भीमाने रचला ऐसा धर्मांतराचा पाया
केलं आम्हाला जगी सुज्ञान , केलं आम्हाला जगी सुज्ञान

दीक्षा बुद्धाची देऊन
अग हे दान दिलय ग भीमानं दीक्षा बुद्धाची देऊन।। 2 ।।

जनसागर हा धावून आला बाबा भीमाच्या चरणावर
कोरियले ते भीमरावाने कोटी जनांच्या हृदयावर

बुद्धं शरणं मंत्र महान ,बुद्धं शरणं मंत्र महान
दीक्षा बुद्धाची देऊन
अग हे दान दिलय ग भीमानं दीक्षा बुद्धाची देऊन।। 3 ।।

बाबा भीमाची ती पुण्याई आली फळाला फोलून
दीक्षाभूमीचा सोहळा आज दिसे नीरजा खुलून

त्या आनंदाला दीधलाय मान , त्या आनंदाला दीधलाय मान
दीक्षा बुद्धाची देऊन
अग हे दान दिलय ग भीमानं दीक्षा बुद्धाची देऊन।। 4 ।।

जाऊ जोडीने येऊ ग पाहून , जाऊ जोडीने येऊ ग पाहून
अशी दीक्षा भूमीची शान, अशी दीक्षा भूमीची शान

अग हे दान दिलय ग भीमानं, अग हे दान दिलय ग भीमानं
दीक्षा बुद्धाची देऊन
अग हे दान दिलय ग भीमानं दीक्षा बुद्धाची देऊन।। धृ ।।