भुलून हलक्यात घेऊ नका
याद आणून देऊ नानी.. नानी
भीमाची औलाद आहे बेटा
लात मारतातच काढतो पाणी.. पाणी
वाकड्यात कुणी शिरला
त्याला कायदेशीर झोडा
पाहून प्रगती आमची
का उठतो पोटी गोळा
भर चौका मध्ये…
भर चौका मध्ये दाखवा काय असतो
भीम जयंतीचा सोहळा
भर चौका मध्ये दाखवा काय असतो
भीम जयंतीचा सोहळा
निळी छाप पाडतो दमदार
जी कमी नाही पडणारी
भीमाची लेकरं
आरपार करून भिडणारी
हिमतीवर स्वतःच्या
उचलला पेन हा
रक्त ना सांडता
भिमान केला क्रांतीचा लढा
शिकवला धडा समता, न्याय, बंधुत्वाचा ( स्वातंत्र्य )
गाजे डंका जिकडे तिकडे भीम कर्तृत्वाचा
कसली ना आता सर
पडली विचारांची भर
गरीब घराच्या पोरान
केला जनतेचा उद्धार
हा फक्त नावाचं आंबेडकर
काफी आहे ,काफी आहे
हा सगळे शाहने झुकले समोर
कोण नाही बाकी आहे
भारताचा तो आधार घटनेचा शिल्पकार
महामानव बोधिसत्व तुमचा ग्रँड फादर
मनगटात आहे जोर आमच्या
मनगटात आहे जोर आमच्या
लेखणी दुधारी
लेखणी दुधारी
शिक्षणाची घेऊन शिदोरी
शिक्षणाची घेऊन शिदोरी
जिंकू जंग सारी
जिंकू जंग सारी
हुकूम शाहीचा कणा
बुडा पासुन तोडा
शब्दाचा पक्का सचिन
सुरेल कडूबाईचा गळा
भर चौका मध्ये…
भर चौका मध्ये दाखवा काय असतो
भीम जयंतीचा सोहळा
भर चौका मध्ये दाखवा काय असतो
भीम जयंतीचा सोहळा…


