घटक | तपशील |
---|---|
गीताचे नाव | बुद्ध हे बुद्धीचे भांडार (Buddha He Buddiche Bhandar) |
गायक | शाहीर विठ्ठल उमप (Shahir Vitthal Umap) |
ज्ञान देउनी अज्ञानाचा दूर करी अंधार
बुद्ध हे बुद्धीचे भांडार
तत्त्व हिताची बोध प्रणाली
वदे जगाला बुद्ध माउली
सन्मार्गाची देई साउली
करी धम्म साकार
बुद्ध हे बुद्धीचे भांडार
पुरुषोत्तम जणू दूत शांतीचा
उद्धारक नव विश्व क्रांतीचा
प्रेरक होऊनि हीन-दीनांचा
करी जगी उद्धार
बुद्ध हे बुद्धीचे भांडार
नश्वर देही दिव्यत्वाने
अष्टशीलेच्या उपदेशाने
मानवतेला तथागताने
दिला दिव्य आकार
बुद्ध हे बुद्धीचे भांडार