Bhimaane Koti Koti Kaljat Song Lyrics | भीमाने कोटीकोटी काळजात बुद्ध कोरला

Singer : Milind shinde
lyricist : vijay kashid

मानवतेचा शिल्पकार ह्या जगामध्ये ठरला
भीमाने कोटीकोटी काळजात बुद्ध कोरला

मानवतेचे जेजे संहारी दिली भीमाने त्यांना ललकारी
बुद्धिपुढे नमल्या तलवारी
मानवतेचा वैरी भीमाने वेळीच मारला
भीमाने कोटीकोटी काळजात बुद्ध कोरला

पाशानांना फोडली वाचा धम्म बुद्धाचा देऊनी साचा
मानवतेचा बनविला ढाचा
पंचशीलेचा मंत्र भीमाने होट्यात भारला
भीमाने कोटीकोटी काळजात बुद्ध कोरला

बुद्ध ज्ञानाचे पाजले नीर अंधश्रद्धा ती लोटली दूर
बुद्ध चरणाशी नमविले शिर
विथुरलेला हा समाज एकतेन हेरला
भीमाने कोटीकोटी काळजात बुद्ध कोरला

निर्मळ जीवनाचा आनंद मानवतेचा दरवळे गंध
हर्ष जाहला हा बेधुंद
विजय तुझ्या परी विश्वाने हा धम्म स्वीकारला
भीमाने कोटीकोटी काळजात बुद्ध कोरला

मानवतेचा शिल्पकार ह्या जगामध्ये ठरला
भीमाने कोटीकोटी काळजात बुद्ध कोरला