अ.क्र. | योजना | सविस्तर माहिती |
---|---|---|
1 | योजनेचे नांव | कन्यादान योजनेखाली नवदाम्पत्यांना अर्थसहाय्य (विजाभज) |
2. | योजनेचा प्रकार | राज्य |
3. | योजनेचा उद्देश | महाराष्ट्रात अनुसूचित जाती,विमुक्त जाती,भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील वेगवेगळया जाती, जमातीतील लोंकाचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणा कमी करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे |
4. | योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव | अनुसूचित जाती/विमूक्त जाती/भटक्या जमाती/इतर मागासवर्ग / विशेष मागासवर्ग |
5. | योजनेच्या प्रमुख अटी | वधु व वर हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असले पाहिजे
वराचे वय 21 वर्ष व वधुचे वय 18 वर्षपेक्षा कमी असू नये जातीचे प्रमाणपत्र सक्षम व प्राधिकृत अधिका-याने दिलेले असावे वधु-वर यांच्या प्रथम विवाहासाठी हे अनुदान अनुज्ञेय राहील नवदांपत्यांतील वधू/वर यापैकी दोन्ही किंवा एक जण हे अनुसूचित जाती (नवबौध्दासह) विमुक्त जाती, भटक्या जमाती (धनगर व वंजारीसह ) विशेष मागास प्रवर्गातील असावेत. बाल विवाह प्रतिबंध कायदा व हुंडा प्रतिबंध कायदयांतर्गत असलेल्या कोणत्याही कलमाचा भंग या दाम्पंत्य/कुटूंब यांचे कडून झालेला नसावा या बाबत लेखी प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक |
6. | दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप | महाराष्ट्रात अनुसुचित जाती (नवबौध्दांसह ) विमुक्त जाती, भटक्या जमाती (धनगर व वंजारीसह ) विशेष मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्टया कमकुवत असलेल्या मागासवर्गीय कुटुंबातील सामुहिक विवाह सोहळयामध्ये सहभागी होऊन विवाह करणा-या जोडप्यांना रु 10000/- इतके अर्थसहाय्य देण्यात येते. सामुहिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्या-या संस्था व संघटनांना प्रत्येक जोडप्या मागे रु 2000/- असे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. या योजनेचा लाभ फक्त प्रथम विवाहासाठी तथापि विधवा महिलेस दुस-या विवाहाकरिता अनुज्ञेय आहे> |
7. | अर्ज करण्याची पध्दत | संबधीत स्वंयसेवी संस्थेने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचेकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. |
8. | योजनेची वर्गवारी | सामाजिक सुधारणा |
9. | संपर्क कार्यालयाचे नांव | संबधीत जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी |