अ. क्र. | योजना | सविस्तर माहिती |
---|---|---|
1. | योजनेचे नाव | औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकणा-या विजाभज व विमाप्र विद्यार्थ्यांना विद्यावेतन. |
2 | योजनेचा प्रकार | राज्यस्तरीय योजना |
3 | योजनेचा उद्देश. | सदरची योजना शासन निर्णय क्र.ईबीसी-1079/56243/डी-1, दि.07.05.1983 अन्वये लागू करण्यात आलेली आहे. सदर योजने अंतर्गत विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचा तांत्रिक शिक्षणाकडे कल वाढण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना विद्यावेतन दिले जाते. तांत्रिक शिक्षण विभागांकडून प्रतिमहा रु.40/- व या विभागामार्फत प्रतिमहा रु.60/- याप्रमाणे विद्यावेतन दिले जाते. ज्या विजाभज व विमाप्र विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण मंडळांकडून विद्यावेतन दिले जात नाही. त्या पात्र विद्यार्थ्यांना प्रतिमहा रु.100/- याप्रमाणे या विभागांकडून विद्यावेतन दिले जाते. |
4 | योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव |
विमुक्त जाती भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग. |
5 | योजनेच्या प्रमुख अटी |
|
6 | दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप | प्रति विद्यार्थी प्रतिमाह रु.100/- या प्रमाणे विद्यावेतन दिले जाते. |
7 | अर्ज करण्याची पध्दत | संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्या कार्यालयाकडे सादर करावेत. |
8 | योजनेची वर्गवारी | शैक्षणिक |
9 | संपर्क कार्यालयाचे नांव |
|
सांख्यिकी माहिती
(रु. लाखात )
अ. क्र. | वर्ष | खर्च | लाभार्थी |
---|---|---|---|
1 | 2012-13 | 17.50 | 4639 |
2 | 2013-14 | 18.50 | 3921 |
3 | 2014-15 | 18.65 | 2498 |