थँक यू ‘बाबासाहेब’ आपल्या संविधानामुळेच देशाचे हे स्वातंत्र्य अबाधित राहिले!

अनेक थोर नेत्यांच्या बलिदानातुन आपल्या देशाला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले, आणि इंग्रज देश सोडून निघून गेले. जवळपास दीडशे वर्ष राज्य करून शेवटी त्यांना ह्या देशातुन पळ काढावा लागला.

देश स्वतंत्र झाल्या नंतर मुख्य जी समस्या म्हणजे देशाचे कानुन तयार करण्याची मग ते करणार कोण ? देशाचे संविधान तयार करणे म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती. ज्ञानी पंडितच हे कार्य करू शकतो. त्यानंतर अशा व्यक्तीचा शोध सुरु झाला आणि शेवटी अनेकांच्या सूचनेनुसार डॉ. बाबासाहेब यांना संविधान निर्मितीची मुख्य जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिली.

आणि अपेक्षे नुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकांनी अतिशय उत्कृष्ट असे संविधान निर्माण केले. हे जगातील एकमेव एवढे मोठे लिखित संविधान आहे. अनेक देश ह्या संविधानाचा आज सुद्धा अभ्यास करतात. तर असे सर्वोत्कृष्ट संविधान निर्मिती मध्ये अनेकजण सहभागी असताना सुध्दा मुख्य कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय परिश्रमाने यशस्वी रित्या हाताळले.

आज आपण पाहत आहेत की आपल्या आजूबाजूच्या देशाची काय हालत आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान उध्वस्त झाले. पण आपला भारत देश एवढ्या विविधता असून सुद्धा अखंड , आणि सुखाने नांदत आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे आपल्या भारताचे संविधान हे आहे.

तर स्वातंत्र्य मिळवणे एक गोष्ट आहे आणि ते मिळालेले स्वातंत्र्य अबाधित ठेवणे ही एक मुख्य गोष्ट आहे. आणि ते आपल्या संविधानाने चोख कामगिरी पार पडली आहे.

तर आज ७८ व्या स्वातंत्र्य दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समस्त देश वासियाने आभार मानले पाहिजे आणि आपले संविधान कसे जास्तीत जास्त काळ टिकेल ह्यासाठी सर्वानी जिद्दीचे प्रयत्न केले पाहिजेत.

ऍड. प्रेमसागर गवळी,
शिवाजी नगर, पुणे
मो. 7710932406

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?