महाविकास आघाडी सोबत जाणार कि नाही याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांचे स्पष्टीकरण…
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना हि युती पत्रकार परिषेदेत जाहीर करण्यात आली असून, यावरून राजकीय वातावरणात बऱ्याचश्या बातम्या पसरू लागल्याने युतीला वेगळे वळण लागते कि काय हे अद्याप देखील स्पष्ट झालेले नाही. युती होऊन काही दिवसच झाले असताना शिवसेनेचे ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांना सल्ला देण्याचे उद्देशाने महा विकास आघाडीच्या स्तंबाबद्दल काहीही बोलू नये असे पत्रकारांना बोलताना त्यांनी म्हंटले आहे.
तसेच वंचित आघाडी सोबत युती केल्यामुळे काही शिवसैनिक पण नाराज असल्याच्या बातम्या आहेत. असे असताना राष्ट्रवादीच्या शरद पवार यांनी देखील या युतीवर भाष्य केले असून यावर वंचित अघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी देखील त्यांचे स्पष्टीकरण दिलेले आहे.
शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी याच्या युतीनंतर राजकीय वर्तुळात बऱ्याचश्या चर्चांना उधाण आल्यासारखं दिसतंय, बऱ्याच महाविकास आघाडीच्या नेत्यांना युतीबद्दल नाराजी दिसत आहे यावर आपले काय मत आहे असा प्रश्न वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडर यांना विचारण्यात आल्यानंतर त्यांनी स्पष्ठ शब्दात आपले उत्तर दिले असून,
ते म्हणतात वंचित बहुजन आघाडीची युती हि उद्धव ठाकरे शिवसेनेशी आहे बाकीच्या कुण्या राजकीय पक्षाचा मला काहीही संबंध नाही मी फक्त शिवसेने बद्दल बोलेन अश्या स्पष्ठ भाषेत उत्तर त्यांनी पत्रकाराशी बोलताना दिले.
महाविकास आघाडीत जाण्याची इच्छा आहे का ?
असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला असून यावर त्यांनी उत्तर देताना सांगितले कि, सध्यातरी यावर मी किव्वा माझ्या पक्षाने काहीही ठरविले नाही. मला काय बोलायचे होते ते मी बोलले आहे. पुढे जो पक्ष ठरवेल तशी भूमिका मी किव्वा आमचा पक्ष घेत जाईल असे उत्तर प्रकाश आंबेडकर यांच्याकडून देण्यात आले.
वंचित बहुजन आघाडी सोबत युतीचा कसलाही प्रस्ताव आमच्याकडे नाही – शरद पवार
वंचित बहुजन आघाडीचा कसलाही प्रस्ताव आमच्यकडे नाही राष्ट्रवादी किव्वा काँग्रेस हे युतीदरम्यान आमच्यापैकी कुणीही तिथं उपस्थित नसल्यामुळे मी आत्ताच यावर काहीही बोलणार नाही. मात्र राष्ट्रवादी, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे आम्ही सर्वजण मिळून निवडणुकीला सामोरे जाण्याचा विचार आम्ही केलेला आहे. असेही शरद पवारांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.