





इ.स. १९७० च्या आसपास मागासवर्गीय जातींवरील अत्याचारांनी कळस गाठला. पेरुमल समितीने त्याचा स्पष्ट निर्देश केला. हे प्रकरण (मागासवर्गीय जातींवरील अत्याचार) इतके गंभीर बनले की २४ मे १९७२ ला मधु लिमयेंनी लोकसभेत त्याविरूद्ध आवाज उठविला. या सगळ्यांचा परिणाम म्हणून दलित समाजातील संतप्त युवकांनी बंडखोरी केली आणि पॅंथरची पहिली बैठक सिद्धार्थ नगर (मुंबई) येथे १९७२ मध्ये भरली. या बैठकीत स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या दलितांवरील वाढत्या अत्याचारास थांबविण्यास सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यासाठी सर्व दलित युवकांनी चळवळीच्या झेंड्याखाली एकत्र जमावे, असे आवाहन झाले. “माणूस म्हणून जगणे हा आमचा हक्क आहे आणि म्हणून आम्ही चित्याचा पवित्रा घेऊन त्या हक्कांसाठी लढू” हे सूचित करणार नामाभिधान त्यांनी स्वीकारले. प्रत्येकाला पॅंथरही आपल्या मनातील असंतोषाचे व्यासपीठ वाटत होती. सर्व तरुण बेदरकार होते. विचाराने वेगळ्या असलेल्या पण एकदिलाने काम करणाऱ्या तरुणांची संघटना म्हणून सुरुवातीच्या पॅंथर चळवळीकडे पाहिले गेले.


पॅंथर चळवळीतील भागवत जाधव यांच्या डोक्यावर भोईवाड्यातील मोर्चादरम्यान एका इमारतीतून दगडी पाटा फेकल्याने त्यांचा मृत्यू झाला. वरीळी दंगलीसाठी नेमलेल्या भस्मे आयोगातील काही शिफारशी स्विकारल्यानंतर पॅंथरचा दरारा वाढला. दलित पॅंथर या चळवळीचे लढाऊ आणि आक्रमक रूप वरळी दंगलीमुळे लोकांच्या पुढे आले. यानंतर पॅंथरच्या गुजरात, दिल्ली, पंजाब व लंडन येथेही शाखा स्थापन झाल्या.

दलित पॅंथर जेव्हा सुरू झाली तेव्हा हजारोंच्या संख्येंने तरुणांनी पॅंथरमधे प्रवेश केला. दलित पँथरचे नेतृत्व प्रामुख्याने नामदेव ढसाळ, राजा ढाले, ज.वि. पवार, जोगेंद्र कवाडे, अविनाश महातेकर, भाई संगारे, अरुण कांबळे, रामदास आठवले, गंगाधर गाडे असे अनेक तळागाळून चळवळीत आलेल्यांनी केले. एकूणच या चळवळीचे नेतृत्व युवक आणि विद्यार्थ्यांकडे असल्याकारणाने पॅंथरची वाटचाल जबरदस्त वेगाने झाली. पॅंथर मधील नेते हे उच्चशिक्षित साहित्यिक असल्यामुळे पॅंथरने आंबेडकरी चळवळ व साहित्याला नवसंजीवनी दिली.

*१)* दलित पॅंथरने दलितावरील अत्याचाराच्या विरोधात आंदोलने केले.
*२)* झोपडपट्टयांचा विस्तार व विकास घडवून आणला असून झोपडपट्टयांमधील रहिवाशांचे प्रश्न सोडविले.
*३)* विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नांवर लढे दिले.
*४)* मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी आंदोलने केले.
*५)* राखीव जागांच्या प्रश्नावर आंदोलन केले.
*६)* नवबौद्धांना सवलतीची मागणी केली.
*७)* बेरोजगारी दूर करण्यासाठी आंदोलने केली.
★ दलित पॅंथरने अशा अनेक प्रश्नांवर आंदोलने उभारून ते मार्गी लावले. शासनावर दबाव निर्माण केला.



#राजेश_म्हस्के_संस्थापक_अध्यक्ष
“#जनता_दरबार_सामाजिक_संघटना_महाराष्ट्र_प्रदेश