बुध्द धम्माबद्दल प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात..

हिंदूधर्मात स्वत:चे म्हणावे असे महान, उच्च, उदात्त काहीही नाही. जे उच्च-उदात्त दाखविले जाते ते प्रत्यक्षात मुख्यत: बौद्धांचे आणि अंशत:अन्य प्रवाहांचे आहे.आज निसर्गाशी संबंधित अनेक सणवार आपण साजरे करतो, त्यापैकी जवळपास सगळे सण बौद्ध परंपरेतून आलेले आहेत.
अनेक अर्थपूर्ण प्रतिकं ही याच संस्कृतीने समाजमनात रुजविलेली आहेत. खरेतर बौद्ध धर्म हाच भारतीय मातीतला पहिला आणि खरा मानवधर्म होय. हाच धर्म भारतीय संस्कृतीवरचा आद्य आणि सखोल ठसा आहे!

बौद्धधर्माचे चेहरे तरी किती लपवणार? ज्यापुरी, शृंगेरी, बद्रीनाथ, द्वारका याठिकाणी शंकराचार्यानी चार हिंदू धर्मपीठे स्थापन केली, ती ठिकाणे मूळची बौद्ध चळवळीचीच महान केंद्रे होती!

पुरीचे जगन्नाथाचे मंदिर हे पूर्वीचे बौद्धमंदिर होते! (इति. स्वामीविवेकानंद!) शृंगेरीचा शंकराचार्याचा मठच बौद्धस्तुपाच्या जागेवर झालेला आहे!

श्रीशैलमचे मंदिरही पूर्वीचे बौद्धशिल्प होते! तिरुपतीचा बालाजी, बद्रीनाथचा बद्रीकेश्वर ही सध्या हिंदूंची म्हणवली जाणारी धार्मिकक्षेत्रे पूर्वीची बौद्धधर्माची महत्त्वाची स्थाने होती

(तिरुपती बालाजी आणि तिथला परिसर नीट न्याहाळला तरी हे लक्षात येते! मुंडन पद्धत ही मूळची बौद्ध परंपरेची!)

बौद्ध धर्माची जी चार प्रमुख सेंटर्स होती त्या ठिकाणी चारधाम यात्रा बौद्ध मंडळींनी सुरू केली. या चारधामांचे यथावकाश अपहरण करण्यात आले. देशातल्या बहुतांश देवदेवता, त्यांच्या मूर्ती आणि मंदिरे मूळची बुद्धिस्टांची आहेत. अगदी कोल्हापूरची महालक्ष्मीची मूर्तीही आणि तिचे मंदिरही!

अशी असंख्य ठिकाणे हिंदू-वैदिकसंस्कृतीने हडप केली आणि तिथे पौराणिक कथांचा व वैदिक कर्मकांडांचा बाजार मांडला! बौद्धधर्म सबंध भारतभर व भारताबाहेर विस्तारला होताच, परंतु महाराष्ट्राच्या अणूरेणूत तो अक्षरश:भिनला होता. लोकसेवेच्या, समतेच्या, ज्ञान-विज्ञानाच्या चळवळी महाराष्ट्राच्या दऱ्या-खोऱ्यातून आणि डोंगरपर्वतातून निनादल्या होत्या! यातूनच महाराष्ट्राचे परमवैभव असलेली बौद्ध लेणी निर्माण झाली आणि महाराष्ट्राच्या भूगोलावर बौद्ध इतिहासाच्या सर्जनशीलतेचा अप्रतिम ठसा कायमचा कोरला गेला! नंतरच्या काळात या लेण्यांबाहेर कुठल्यातरी चमत्कृतीपूर्ण शिवाची, देवाची किंवा देवीची उभारणी करून बौद्धलेण्यांना हायजॅक करण्यात आले! त्यासाठी काल्पनिक देवदेवतांच्या सुरस कहाण्यांना ऊत आणला गेला!

प्रबोधनकार ठाकरे पुढे म्हणतात, ‘फारदूर नको, लोणावळ्याजवळची कार्ला लेणी पाहा. ही वास्तविक बौद्धांची! तेथल्या त्या ओटय़ा, ते दिवाणखाने, ते स्तूप, साऱ्या बौद्धांच्या स्वाध्यायश्रमाच्या जागा! तेथे बाहेर एक देवी अचानक प्रगट झाली! तिचे नाव एकविरा!
हिला वेहेरीची देवी असेही म्हणतात. ही पांडवांची बहीण. हिच्यासाठी भीमाने म्हणे एका रात्रीत ही लेणी कोरून काढली! ’किती उदाहरणे सांगायची? आज शाळा-कॉलेजांमधून आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.

परंतु हा‘गुरू’ कोण हे कुणाला माहीत नाही! हा गुरू आहे, गौतम बुद्ध! त्यानि पाच शिष्यांना केलेल्या पहिल्या उपदेशामुळे पहिली गुरुपौर्णिमा साजरी झाली आणि तिथून तो पायंडा पडला! (पण आज गुरुपौर्णिमा बिनबोभाटपणे व्यास महाशयांच्या नावावर खपविली जातेय!)

मंगळसूत्र, मंगलाष्टका असे अगणित शब्द बौद्धपरंपरेतूनच आलेले आहेत. थोडक्यात, आपल्या लोकसंस्कृतीवर असलेला बौद्धधर्माचा, बौद्ध प्रतिकांचा, बौद्धविचारतत्त्वांचा ठसाच इतका अमीट आहे की, त्यापासून बाजूला होऊ म्हटले तरी होता येत नाही, अशी परिस्थिती आहे. भारताच्या राष्ट्रध्वजावरचे अशोकचक्र हे बौद्धधम्मचक्रप्रवर्तनाचेच प्रतिक आहे!

भारताची अधिकृत शासकीय राजमुद्रा ही बौद्धपरंपरेचीच खूण आहे. राष्ट्रपतीभवनात राष्ट्रपतीच्या आसनामागे दर्शनी जागी ठळक अक्षरात‘धर्मचक्रप्रवर्तन’ असे कोरलेले आहे.

सन्दर्भ : देवळाचा धर्म आणि धर्माची देउळे
लेखक :- प्रबोधनकार ठाकरे
— — — — — — — — — — — — — —
ही माहीती एका तरी मित्रासोबत जरूर शेअर करा.

देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे  हे संपूर्ण पुस्तक डाउनलोड करण्यासाठी व वाचण्यासाठी येथे क्लिक करा –   https://bit.ly/2ISiEHO


Buy T-Shirt Online with Ambedkar and Buddha Image, Design

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?