अनुसरा शिकवण बुद्धाची |Anusara Shikavan Buddhachi lyrics |

Song – Anusara Shikavan Buddhachi

Lyrics by –  Ram More

Album –  Namostu Gautama

Singer – Pralhad Shinde

Music – Pralhad Shinde

Music Label – Sa Re Ga Ma
Release On – Jun 1961

Anusara Shikavan Buddhachi | अनुसरा शिकवण बुद्धाची

जीवनातल्या मंदिरी बांधा पूजा समतेची
अनुसरा शिकवण बुद्धाची

अज्ञानी हा समाज सगळा
दैवाहाती माणूस दुबळा
सर्वावरती पाखर असुद्या अपुल्या मायेची
अनुसरा शिकवण बुद्धाची

युद्धामधुनी विनाश आहे
विनाशातूनी दुःखच वाहे
शस्त्राहूनही महान जगती
शांती अहिंसेची
अनुसरा शिकवण बुद्धाची

दीप आपुला आपण व्हा रे
तम अज्ञाना दूर करा रे
हृदयी अपुल्या ओढ असुद्या
सम्यक ज्ञानाची
अनुसरा शिकवण बुद्धाची

जीवनातल्या मंदिरी बांधा पूजा समतेची
अनुसरा शिकवण बुद्धाची

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?