अ.क्र. | योजना | सविस्तर माहिती |
---|---|---|
1. | योजनेचे नाव | अनुसुचित जातीच्या मुला मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती |
2. | योजनेचा प्रकार | राज्य |
3. | योजनेचा उदेृश | अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना आर्थिक परीस्थीतीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापिठामध्ये प्रवेश घेता येत नाही. विद्यार्थ्यांची गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक परिस्थितीमूळे त्यांना उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागते. या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा म्हणुन परदेशातील नामांकित विद्यापिठामध्ये ज्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर व पी.एच.डी. अभ्यासक्रमा करिता प्रवेश मिळाला आहे, अशा 50 (पी.एच.डी.-24 व पदव्युत्तर -26) विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. |
4. | योजना ज्या प्रवगासाठी लागू आहे त्याचे नाव | अनु. जाती |
5. | योजनेच्या प्रमुख अटी | 1.विद्यार्थी अनु. जाती/नवबौध्द घटकातील असावा 2.विद्यार्थी महाराष्ट्राचा रहवासी असावा 3.विद्यार्थ्याचे वय 35 वर्षापेक्षा जास्त नसावे 4.विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 6.00 लाखापेक्षा जास्त नसावे 5.पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर पदवीमध्ये किमान 50 % गूण व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी पदवीमध्ये किमान 55 % गूण मिळालेले असावे तसेच प्रथम प्रयत्नामध्ये उत्तीर्ण असावा. 6.विद्यार्थ्यांने परदेशातील विद्यापिठात प्रवेश घेतलेला असावा. 7.परदेशातील विद्यापिठ हे मान्यताप्राप्त विद्यापिठ असावे व qs world ranking मध्ये 300 च्या आत असावे. 8.पदव्युत्तर पदवीमध्ये अभ्यासक्रमासाठी पदवीला किमान 50 % गुण आवश्यक , व प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा. |
6. | दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप | 1.विद्यापिठाने प्रमाणित केलेला शिक्षण फी ची पुर्ण रक्कम व इतर खर्च मंजूर करण्यात येतो. 2.विद्यार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता अमेरिका व इतर राष्ट्रासांठी यु.एस. डॉलर 14000 तर यु.के.साठी पौंड 9000 इतका अदा करण्यात येतो. 3.विद्यार्थ्याला आकस्मिक खर्चासाठी यू.एस.ए. व इतर देशांसाठी यु.एस.डी. 1375 वर यु.के.साठी पौंड 1000 इतके देण्यात येतात. पुस्तके, अभ्यासदौरा इत्यादी खर्चाचा यात समावेश आहे. 4.विद्यार्थ्यास परदेशात जाताना व अभ्यासक्रम झाल्यानंतर परत येताना विमान प्रवासाचा खर्च तिकीट सादर केल्यानतंर मंजूर करण्यात येतो. |
7. | अर्ज करण्याची पध्दत | जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सदर शिष्यवृत्तीचा अर्ज आयुक्तालयास सादर करावा |
8. | योजनेची वर्गवारी | शिक्षण |
9. | संपर्क कार्यालयाचे नाव | आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे |
सांख्यिकी माहिती रुपये लाखात
अ.क्र. | वर्ष | खर्च | लाभार्थी |
---|---|---|---|
1 | 2012-13 | 1250.39 | 85 |
2 | 2013-14 | 1294.94 | 75 |
3 | 2014-15 | 1307.41 | 69 |