अ.क्र. |
योजना |
सविस्तर माहिती |
1. |
योजनेचे नांव |
सैनिक शाळेतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता |
2 |
योजनेचा प्रकार |
राज्य |
3 |
योजनेचा उद्देश |
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळावा, सैन्यदलात भरती होण्याचे विद्यार्थी दशेतच त्यांच्यात निर्माण व्हावे, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, शौर्य, सांघिक वृत्ती, नेतृत्व, देशभक्ती इत्यादी गुणांची जोपासना होण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. |
4 |
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव |
अनुसूचित जाती |
5 |
योजनेच्या प्रमुख अटी |
- विद्यार्थी 5 वी ते 10 वी पर्यंतच्या वर्गात शिकत असलेला असावा.
- विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द या प्रवर्गातील असावा.
- पालकाचे वार्षिक उत्पन्न रु. 2.00 लाख पेक्षा जास्त नसावे.
|
6 |
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप |
- नाशिक, पुणे, सातारा येथील सैनिक शाळांमध्ये शिकणा-या अनु.जाती व नवबौध्द विद्यार्थ्याची शिक्षण फी, परीक्षा फी, भोजन, निवास, कपडे, घोडेस्वारी इत्यादीवर होणा-या संपुर्ण खर्चाची प्रतीपुर्ती करण्यात येते.
- इतर मान्यताप्राप्त सैनिक शाळांना प्रति विद्यार्थी प्रतिवर्षी 15000/- शिष्यवृत्ती देण्यात येते.
|
7 |
अर्ज करण्याची पध्दत |
या योजनेसाठी http//mahaeschool.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक |
8 |
योजनेची वर्गवारी |
शैक्षणिक |
9 |
संपर्क कार्यालयाचे नांव |
- संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण
- संबंधित सैनिक शाळेचे प्राचार्य
|