तूझ्या विना रमा मजला सुने सुने सारे जग वाटे
सोडून का मजला रमा चालली तू कोठे
साथ देईन शेवट पर्यन्त सुखा दुखाच्या वाटेवरी
बोलना रमा मजशी का रुसलीस माझ्या वरी
दुख सागरी लोटूनीया तोडूनी हे नाते
सोडून का मजला रमा चालली तू कोठे
सोडून का मजला रमा चालली तू कोठे
कष्ट साहुणी भार वाहूणी मज साठी तू उपवाशी
भीमराव आंबेडकरा तुझ्या विना शोभा ही कशी
तुझ्या विना जगू मी कसा तगमग जिवाची होते
सोडून का मजला रमा चालली तू कोठे
सोडून का मजला रमा चालली तू कोठे
कोण वाहिल काळजी माझी तू गेल्या पाठी ही रमा
संसारी रमा दुखाची पर्वा केली नाही तमा
प्रभाकरा विद्याधराची कविता टाहो थोडी ते
सोडून का मजला रमा चालली तू कोठे
सोडून का मजला रमा चालली तू कोठे
तूझ्या विना रमा मजला सुने सुने सारे जग वाटे
सोडून का मजला रमा चालली तू कोठे