शांतीचा ध्यास मनी धरला, बुद्ध जगी वंदनीय ठरला
बोधीवृक्षाच्या छायेत,
ध्यान लावुनिया एकांत
मनाचा मेरू सावरला
शांतीचा ध्यास मनी धरला, बुद्ध जगी वंदनीय ठरला
बुद्धीला होताचि जाण
केली मग शांती परिधान
अखेरी मारच तो हरला
शांतीचा ध्यास मनी धरला, बुद्ध जगी वंदनीय ठरला
शोधिता मानवी कल्याण
अंती परिणाम तो जाणून
अंतरी त्यागच तो भरला
शांतीचा ध्यास मनी धरला, बुद्ध जगी वंदनीय ठरला
करुणा दया क्षमा शांती
हीच हो बुद्धाची क्रांती
मार्ग बहुतांनी अनुसरला