रतन सुत्त
यानीध भूतानी समागतानि| भूम्मानि वा यानी व अन्तलिखे|तथागतं देवननुस्सपूजितं|बुद्ध नमस्साय सुवत्थि होन्तु||१||
यानीध भूतानी समागतानि| भूम्मानि वा यानी व अन्तलिखे|तथागतं देवननुस्सपूजितं|धम्म नमस्साय सुवत्थि होन्तु||२||
यानीध भूतानी समागतानि| भूम्मानि वा यानी व अन्तलिखे|तथागतं देवननुस्सपूजितं|संघ नमस्साय सुवत्थि होन्तु||३||
यानीध भूतानी समागतानि| भूम्मानि वा यानी व अन्तलिखे|सब्बेवभूता सुमना भवन्तु अथोपि सक्कच सुणन्तु भासितं||४||तस्मा हि भूता निसामेथ सब्बे| मेत्तं करोथ मानुसिया पजाय|दिवा रत्तोच हरन्ति ये बलिं|तस्माहि ने रक्खथ अप्पमत्ता||५||
य किञ्चि वित्त इधं वा हूंर वा| सग्गेसु वा यं रतनं पणीतं | न नो समं अत्थि तथागतेन| इदम्पि बुद्धे रतनं पणीत|एतेन सच्चन सुवत्थि होतुं||६||
खयं विरांग अमतं पणीतं|यदज्झगा साक्यमुनी समाहितो न तेन समात्थि किंञ्चि| इदम्पि धम्मे रतनं पणीतं|एतेन सच्चेन सुवत्थि होतुं||७||
यं बुद्धसेट्ठो परिवण्मयि सुचिं| समाधिमानन्तरिकञ्ञमाहू| समाधिना तेन सभो न विज्जति| इदम्पि धम्मे रतनं पणीतं|एकेन सच्चेन सुवत्थि होतुं||८||
ये पुग्गला अठ्ठसतं पसत्था|चतारी येतानि युगानि होन्ति|ते दक्खिणेच्या सुगतस्स सांवका|एतेसु दिन्नानिमहप्फलानि|इदम्पि संघ रतनं पणीतं|एतेन सच्चेन सुवत्थि होतुं||९||
ये सुप्पयुत्ता मनसा दळ्हेन|निक्कामिनो गोतमसासनम्हि| ते पत्तिपत्ता अमतं विगह्य| लद्धा मुधा निब्बुती भुञ्जमाना|इदम्पि संघे रतनं पणीतं|एतेन सच्चेन सुवत्थि होतुं||१०||
यथिन्दखीले पठविं सितोसिया|चतुब्भि वातेभी असम्पकम्पियो| तथूमप सप्पुरिसं वदामि|यो अरियसच्चानि अवेच्च पस्सति|इदम्पि संघे रतनं पणीतं |एतेन सच्चेन सुवत्थि होतुं||११||
ये अरियसच्चानि विभावयन्ति|गंभीरपञेन सुदेसितानि|किञ्चापिते होन्ति भुसप्पमत्ता|न ते भवं अठ्ठम आदियन्ति|इदम्पि संघे रतनं पणीतं, एतेन सच्चेन सुवत्थि होतु||१२||
सहावस्स दस्सनसंपदाय|तयस्सु धम्मा जहिता भदन्ति|सक्कायदिट्ठि विचिकिच्छितंञ्च|सीलब्बतं वा पियदत्थि किञ्चि|चतूहपायेहि च विप्पमुतो छचाभिठानानि अभब्बो कांतु|इदम्पि संघे रतनं पणीतं, एतेन सच्चेन सुवत्थि होतु||१३||
किञ्चापि सो कम्म करोति पापकं कायेन वाचाउद चेतसा वा |अभब्बो सो तस्स पटिच्छदाय|अभब्बता दिट्ठ पदस्य वुत्ता|इदम्पि संघे रतनं पणीतं, एतेन सच्चेन सुवत्थि होतु||१४||
वनप्पगुम्बे यथा फुस्सितग्गे|गिम्हाणमासे पठिमस्मिं गिम्हे|त्तथूपमं धम्मवर अदेसयि|निब्बाणगामिं परम हिताय|इदम्पि बुद्धे रतनं पणीतं, एतेन सच्चेन सुवत्थि होतु||१५||
वरो, वरञ्ञू, वरदो वराहरो| अनुत्तरो धम्मवरं अदेसयि|इदम्पि बुद्धे रतनं पणीतं, एतेन सच्चेन सुवत्थि होतु||१६||
खीणपुराणं नवं नत्थि संभवं|विरत्तचिता आयतिके भवस्मि|ते खीणबीजा अविरुल्हिछन्दा|निब्बान्ति धीरा यथा यं पदीपो|इदम्पि बुद्धे रतनं पणीतं, एतेन सच्चेन सुवत्थि होतु||१७||
मराठी अर्थ
जे भुगत किंवा आकाशातील प्राणी येथे जमले असतील त्यांना मी विनंती करतो की, आपण तथागत बुद्धाला नमस्कार करू जेणे करून तुमचे कल्याण होईल ||१||
जे भूमिगत किंवा आकाशातील प्राणी येथे जमले असतील त्यांना मी विनंती करतो की, ज्याला सर्व मनुष्य आणि देव आदि पूज्य मानतात, त्या तथागताच्या धम्माला नमस्कार करू जेणे करून तुमचे कल्याण होईल.||२||
जे भूमिगत किंवा आकाशातील प्राणी येथे जमले असतील त्यांना मी विनंती करतो की, ज्याला सर्व मनुष्य आणि देव आदि पूजतात त्या तथागताच्या संघाला नमस्कार करू जेणे करून तुमचे कल्याण होईल.||३||
जे भूमिगत किंवा आकाशातील प्राणी येथे जमले असतील ते सर्व आनंदित होवोत. आणि सुभाषित आदरपूर्वक ऐकतो ||४||
म्हणून हे सर्व प्राण्यांनो, हे ऐका व मनुष्य जातीवर प्रेम करा. रात्रदिवस मनुष्य तुमची जोपासना करतात, म्हणून त्यांचे तुम्ही सावधानपणे रक्षण करा.||५||
इहंलोकी किंवा परलोकी जे धन असेल, किंवा स्वर्गात जे उत्तम रत्न असेल ते आमच्या तथागताच्या तोडीचे असणार नाही, बुद्धांचे ठायी वसणारे हे उत्तम रत्रन आहे, ह्या रत्ना चे स्मरण केल्याने तुमचे कल्याण होईल.||६||
ज्या निश्चल मनाच्या शाक्यामुनीने तृष्णाक्षयमय, विरागमय अमर असा जो उत्तम धन जनाला, त्याच्या सारखा दुसरा नाही, धम्माचे ठायी वरणारे हे उत्तम रत्न आहे. ह्या रत्नाचे स्मरण केल्याने तुमचे कल्याण होईल. ||७||
ज्या शुद्ध समाधीची बुद्धश्रेष्ठाने प्रशंषा केली जीला ताबडतोब फळ देणारी म्हणतात, त्या समाधी सारखी दुसरी नाही, धम्माचे ठायी वासणारे हे उत्तम रत्न आहे. ह्या रत्नांचे स्मरण केल्याने तुमचे कल्याण होईल.||८||
सज्जनांचे पसंत ज्या आठ व्यक्ती, ज्यांच्या चार जोड्या होतात, ते सुगतचे श्रवक पूजनीय होत, त्यांना दिलेले दान महाफलदायक होते, संघाचे ठायी वसणारे हे उत्तम रत्न आहे, स्मरण केल्याने तुमचे कल्याण होईल.||९||
जो सर्वस्वाचा त्याग करून दृढ मनाने गौतमाच्या धम्मात प्रवेश करतात, ते अरहंतप्रद प्राप्त करून आणि अमृताचे अवलोकन करून अनायासे मिळालेल्या शांतीचा उपभोग घे तेतात. संघाचे ठायी वसणारे हे उत्तम रत्न आहे. ह्या रत्नांचे स्मरण केल्याने तुमचे कल्याण होईल.||१०||
जे गंभीर – प्रज्ञाने उत्तम रीतीने उपदेशिलेल्या चार आर्य सत्यांची भावना करतात,ते जरी किती बेसावधपणाने वागले तरी आठवा जन्म घेत नाहीत| संघाचे ठायी वासानारे हे उत्तम रत्न आहे, ह्या तत्नचे स्मरण केल्याने तुमचे कल्याण होईल. ||११|
जे गंभीर प्रज्ञेने (बुद्धाने) उत्तम रितीने उपदेशीलेल्या चार आर्य सत्यांची भावना करतात,ते जरी कितीही बेसावधपणे राहिले तरी आठ लोक धर्माने विचलित होत नाहीत. संघाच्या ठायी वसणारे हे उत्तम रत्न आहे. ह्या रत्नाचे स्मरण केल्याने तुमचे कल्याण होईल.||१२|
सम्यक दृष्टी प्राप्त झाल्यावर तो चार आर्य सत्यांची भावना करणारा देहात्मदृष्टी कुशंका व व्रत वैकल्य, उपासना सारख्या गोष्टीनं वर असलेला विश्वास या तीन गोष्टी सोडून देतो. चार दुर्गतीपासून मुक्त होतो व सहा वाईट गोष्टी त्यांच्या हातून घडणे असंभवनीय होते. संघाचे ठायी वसणारे हे उत्तम आहे. ह्या रत्नांचे स्मरण केल्याने तुमचे कल्याण होवो.||१३||
जर त्याच्याकडून कायेणे, वाचेने किंवा मनाने काही वाईट घडले, तर ते तो कदापि झाकून ठेवणारे नाही. निर्वाणपदे ज्याने प्राप्त केले आहे, अशा व्यक्तीच्या हातून कोणतेही वाईट कृत्य घडणे शक्य नाही. संघाचे ठायी वसणारे हे उत्तम रत्न आहे. ह्या रत्नांचे स्मरण केल्याने तुमचे कल्याण होवो.||१४||
उन्हाळ्याच्या पहिल्या महिन्यात जसा एखादा वनगुल्म साग्र प्रफुल्लित व्हावा, तव्दत बुद्धाने निर्वाणगामी, परमक्षेष्ठ धम्म लोकहितार्थ उपदेशिला. बुद्धाचे ठायी वसणारे हे उत्तम रत्न आहे. ह्या रत्नांचे स्मरण केल्याने तुमचे कल्याण होवो.||१५||
श्रेष्ठ श्रेष्ठज्ञ, श्रेष्ठद, श्रेष्ठतम असणाऱ्या, अनुत्तर अशा बुद्धाने सध्दम्म उपडेशिला आहे. बुद्धाचे ठायी वसलेले हे उत्तम रत्न आहे ह्या रत्नांचे स्मरण केल्याने तुमचे कल्याण होवो.||१६||
ज्याचे जुने कर्म क्षीण झाले आहे व नवे उतपन्न होत नाही, जे भावी जन्माविषयी निरपेक्ष आहेत, ते क्षीणबीज आणि विरहित धीर पुरुष, ह्या प्रदिपाप्रमाणे निर्वाण पावतात. संघाचे ठायी वसणारे हे उत्तम रत्न आहे. ह्या रत्नाचे स्मरण केल्याने तुमचे कल्याण होवो.||१७||



