| श्रेणी | माहिती |
|---|---|
| गीताचे नाव | समाजाच्या साठी तुझं रक्त वाहू दे / मला तुझ्या रक्तामधला भीम पाहू दे |
| गायिका (Singer) | भाग्यश्री इंगळे (Bhagyashree Ingle) |
| गीतकार (Lyricist) | केवळ जी. कावळे (Keval Ji Kawale) |
समाजाच्या साठी तुझे रक्त वाहू दे
समाजाच्या साठी तुझे रक्त वाहू दे
अन मला तुझ्या रक्तमधला भीम पाहूदे
भीम पाहूदे, मला भीम पाहूदे , मला भीम पाहूदे
पैदा होऊ दे आता तू पैदा होऊ दे,
मला तुझ्या रक्तामधला भीम पाहुदे
रोज मरते इथे जनता भोळी
होती कुणाच्या जीवनाची होळी
राज कर्त्याला लाज नाही थोडी
त्याच निखाऱ्यावर शेकतात पोळी
कुणी नावासाठी झुरताना पाहिले
घर आपलेच भरताना पाहिले
ज्यांनी धोका दिले भीमाला
पाय त्याचेच धरताना पहिले
आर जाग येऊ दे रे तुला जाग येऊ दे
आर जाग येऊ दे रे तुला जाग येऊ दे
मला तुझ्या रक्तमधला भीम पाहूदे
भीम पाहूदे, मला भीम पाहूदे , मला भीम पाहूदे
मला तुझ्या रक्तामधला भीम पाहुदे
कार्य भीमाचे तव हातून घडतील
तुला पाहून वैरी ही जळतील
तुझ्या छातीवरी गोळी कुणी झाडतील
तुझ्या धर्याने लोक जेंव्हा जुडतील
समता न्याय हक्कासाठी झगडतील
क्रांती करायला तुटून पडतील
तवा वैऱ्याचे अवसान गळतील
अन होऊन जाऊ दे, होऊन जाऊ दे
अन मला तुझ्या रक्तमधला भीम पाहूदे
मला तुझ्या रक्तमधला भीम पाहूदे
अन जाग येऊ दे रे तुला जाग येऊ दे
अन मला तुझ्या रक्तामधला भीम पाहुदे
मला तुझ्या रक्तमधला भीम पाहूदे
भीम रायाचा तू शूर शीपही
वैऱ्या संगती लढाया लढाई
तुझा निर्धार खंबीर असावा
त्यात स्वार्थीपणा ना दिसावा.
आर तुझ्या विचारात क्रांतिकारी रान पेटू दे
तुझ्या विचारात क्रांतिकारी रान पेटू दे
अन मला तुझ्या रक्तामधला भीम पाहुदे
कुणी कुणाचा उरलाच न्हाय
कवी केवळ आहे का उपाय?
एक दुसऱ्याचे ओढणार पाय
रथ भीमाचा हाकतील काय
मर्द तोच खरा भीमाच्या प्रति
भीम रथाची वाढवितो गती
त्याची वाघाच्या बछड्याची छाती
अहो त्याला मरणाची वाटेना भीमा
पैदा होऊ दे, पैदा होऊ दे,
मला तुझ्या रक्तामधला भीम पाहुदे
मला तुझ्या रक्तामधला भीम पाहुदे


