आज उगवला .. आज उगवला
समतेचा दिस दारी
माझ्या भीमाची … भीमाची
जयंती जगात भारी
त्यानं शिकवली… शिकवली
जगाला दुनियादारी
माझ्या भीमाची… भीमाची
जयंती जगात भारी
लेखणी भीमाची …भीमाची
भीमाची हो देखणी
तिनं घडवली .. घडवली
आमची जिंदगाणी
देऊन देशाला …कणखर संविधान
जातीच्या मातीत …पिकवलं समतेचं सोनं
जातीवाद्यांना .. जातीवाद्यांना
जातीवाद्यांना भीम देई ललकारी
भिमक्रांतीनं …क्रांतीनं …
किमया घडवली न्यारी
बुद्ध धम्माची …बुद्ध धम्माची
बुद्ध धम्माची वाट त्यानं दावली
पंचशीलेची दिली जणू सावली
आज नाचूया नाचूया
होऊनीया बेभान
करू साजरा सण ह्यो आनंदानं
भीमसूर्याचा …भीमसूर्याचा
भीमसूर्याचा पसरला लखलखाट घरोघरी
माझ्या भीमाची… भीमाची
जयंती जगात भारी


