जाती मोडण्यासाठी बौद्ध धर्माचा स्वीकार हाच एक उपाय

“धर्म शुद्ध तत्त्वावर आधारित असला पाहिजे. बुद्धाचा वर्णाश्रम पद्धतीवर कधीच विश्वास नव्हता. ‘आपण सर्व सारखेच आहोत’ ही गोष्ट आपण कधीच विसरता कामा नये. माणसा-माणसात कसलाच भेदभाव नाही. जन्माने उच्च नीच कोणीच असू शकत नाही. उच्चनीचता करणीने प्राप्त होते. या गोष्टी बुद्धाने सांगितल्या आहेत. जर लोक पुन्हा बुद्धाचा अंगीकार करतील तर हा देश पुन्हा वैभवाप्रत गेल्यावाचून राहणार नाही. एरव्ही दुसऱ्या कोणत्याही मार्गाने जातीभेद जाणे शक्य नाही. परंतु खरोखरच कोणाला जाती मोडायच्या असतील तर त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करावा; हाच एक उपाय आहे.”

~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.

दि. २० मे १९५१, नवी दिल्ली येथे बुद्ध जयंतीला केलेल्या भाषणातून.