गेली सांगुन बुध्दाची वाणी | Geli sangun Buddhachi vani song lyrics

singer           Anand Shinde, Milind Shinde
Lyricist Kalenand Kuvefalkar
Music Composer         Harshad Shinde, Madhukar Pathak, Anand Shinde
Album                               Buddhache Abhiyan (किंवा Vaani Aika Ho Buddhachi)

मंगलमय क्षणी धम्माची गाणी
पडावी सर्वांच्या कानी हो
गेली सांगुन बुध्दाची वाणी

जन्म ज्याला मृत्यू त्याला
नाही यात शंका
माझे माझे म्हणून का
मानव पिटीत राहतो डंका

क्षण भंगुर या जीवनी कशाला
अभिमान तो मानी
गेली सांगुन बुध्दांची वाणी ।।२।।

परस्त्री माता, परस्त्री बहीण
पर धन नाही आपले
तथागतांनी निवांत ठायी मनोमनी जप जपले
स्वतः तरुणी प्रेमाने सारा
पशु आणि तो प्राणी
गेली सांगुन बुध्दांची वाणी ।।२।।

मंगलमय क्षणी धम्माची गाणी
पडावी सर्वांच्या कानी
गेली सांगुन बुध्दांची वाणी ।।२।।

तो दिवसाची किमया मोठी
घडती गाठी भेटी
प्रसंग येता बघा शेवटी
कोण थांबे कोणासाठी
मानव जन्म एकदाच रे
नाही कोणाचा कोणी
गेली सांगुन बुध्दांची वाणी ।।२।।

दया क्षमा अन शांती असावी
नसाव नुसतं युध्द
वाचा शुध्द , काया शुध्द
नीती असावी शुध्द

कालेनंदा अमृत झाले
रोहिणी नदीचे पाणी
गेली सांगुन बुध्दांची वाणी ।।२।।

मंगलमय क्षणी धम्माची गाणी
पडावी सर्वांच्या कानी
गेली सांगुन बुध्दांची वाणी