धम्म वंदना
धम्मंजीविंतं परियंतं सरणं गच्छामि ||१||
निय्यानिको तं पणमामि धम्मं|६||
मराठी अर्थ
भगवंताने ज्या धम्माचा सुंदर उपदेश केला, ज्याचे सत्यत्व येथेच डोळ्यासमोर पाहता येते, जो धम्म आपले फळ ताबडतोब देतो, कोणाही ज्याचा अनुभव घ्यावा, जो निर्वणाकडे घेऊन जातो,
हा सिद्धांत विज्ञानाच्या द्वारे स्वतः अनुभवून पाहता येतो.
अश्या या धम्माचे जन्मभर अनुसरण करण्याचा मी निर्धार करीत आहे.||१||
मागे झालेल्या बुद्धाने जो धम्म उपदेशिला व पुढे होणारे बुद्ध जो धम्म सांगतील व हल्लीच्या बुद्धाने जो धम्म सांगितला आहे, त्या सर्वांनी मी सदासर्वदा वंदन करतो.||२||
मी दुसऱ्या कोणाला सरण जाणार नाही, माझे अन्य
कोणतेही सरणस्थान नाही. बौद्ध धम्मच माझे दुसरे
सरणस्थान आहे. या सत्य वचनाने माझे जय मंगल होवो.||३||
सर्व दृष्टीनी श्रेष्ठ असलेल्या धम्माला नतमस्तक होऊन वंदन करतो, धम्मासंबंधी माझ्याकडून काही दोष घडला असेल,
तर त्याबद्दल मला क्षमा असो.||४||
ह्या जगात जी निरनिराळी अनेक रत्न आहेत,
त्यापैकी एकानेही बौद्ध धम्माची बरोबरी होणार नाही.
या सत्य वचनाने माझे कल्याण होवो. ||५||
हा बौद्ध धम्म एक असा सरळ मार्ग आहे की, जो शांतीकारण, उत्तम मार्गाने घेऊन जाणारा, अष्टांगानी युक्त, तसेच लोकांनी सुख
देणारा आहे. त्या धम्माला मी प्रणाम करतो. ||६||



