| घटक | माहिती |
|---|---|
| Singer | Anand Shinde |
| Lyricist | Sagar Pawar |
| Music By | Anand Shinde (DJ Mix) |
| Album / Theme | दिल्लीचं दालन (Delhi cha dalan) |
| Lyrics Source | Bheemgeet.com (via ‘Dillicha Dalan’) |
माय जगात त्याच्या नावाची व~~~
नोंद लिहून आली
अशी मोठी भीमसाहेबानं ~~~
कामगिरी केली.
कुणी नाय केलं…. (संगीत)
कुणी नाय केलं…
कुणी नाय केलं भलं व माय, भीमानं केलं
दिल्लीच दालन…
दिल्लीच दालन खुलं व माय, भीमानं केलं
कुणी नाय केलं भलं व माय, भीमानं केलं
मग, दिल्लीच दालन खुलं व माय, भीमानं केलं ।। धृ ।।
एका वकिलाच्या लेखणीनं
त्याच्या कायद्याच्या आखणीनं
आमच्या हक्काचं…
आमच्या हक्काचं…
आमच्या हक्काचं लेखन व माय, भीमानं केलं
मग, कुणी नाय केलं भलं व माय, भीमानं केलं
अग, दिल्लीच दालन खुलं व माय, भीमानं केलं ।। १ ।।
तुमच्या पोरानं शाळेत शिकावं
आश्या लाचारीला मुकावं
असं सभेमधी…
असं सभेमधी…
असं सभेमधी भाषण व माय, भीमानं केलं
मग, कुणी नाय केलं भलं व माय, भीमानं केलं
अग, दिल्लीच दालन खुलं व माय, भीमानं केलं ।। २ ।।
त्या नागाच्या नागपुरात
आणलं बुद्धाच्या घरात
नामकरण हे…
नामकरण हे…
नामकरण हे नवं व माय, भीमानं केलं
अग, कुणी नाय केलं भलं व माय, भीमानं केलं
ते, दिल्लीच दालन खुलं व माय, भीमानं केलं ।। २ ।।
त्या रामजीबाबा प्रमाण
काल सागर आमच्या भीमानं
जन छावणीचं…
जन छावणीचं…
जन छावणीचं राखण व माय, भीमानं केलं
अग, कुणी नाय केलं भलं व माय, भीमानं केलं
अग ते, दिल्लीच दालन खुलं व माय, भीमानं केलं ।। ३ ।।
हे, कुणी नाय केलं भलं व माय, भीमानं केलं
अग, दिल्लीच दालन खुलं व माय, भीमानं केलं.
—
आपल्या मनाला स्पर्शणारे आंबेडकरी ऑडिओ सॉंग्स ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
https://music.brambedkar.in/
Note: All song lyrics published on this website belong to their respective copyright owners. We do not claim any ownership over the content and share it strictly for informational and educational purposes.


