| पैलू | माहिती |
|---|---|
| गीतकार / कवी | वामनदादा कर्डक (महाकवी) |
| Singer (गायक) | विविध आवृत्त्या—उदा. स्वरसम्राट कुणाल बोदडे, मेघानंद जाधव, अश्विन निर्भवने |
पहाट झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली !
चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली !!
सफेद साडीवर सफेद खण चोळी !
लेऊन आली ती गगनाची भोळी !!
ओवाळाया भीमसख्याला आतुर ती झाली !
चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली !!
घरी करी कोणी पुरणाची पोळी !
गीत कुणी ओठी भीमाचे भोळी !!
फोटो पाहून बघुन कोणी म्हणे भीमाला वाली !
चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली !!
असाच कैवारी मिळो पुन्हा कोणी !
उचलून देणारा तत्वाचं लोणी !!
असेच त्याचे गीत घुमावे निळ्या आभाळाखाली !
चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली !!
अधिक भीम गीतांचे lyrics साठी येथे क्लिक करा
एका तुतारीने जागविले कोटी !
एका ध्वजाखाली वागविले पोटी !!
मानवतेचा दूत असावा हा असाच वैभवशाली !
चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली !!
जमेल जनसागर ऐकाया गाणे !
उठ बिगी वामन तुला तिथे जिणे !!
उलट झाली सांज सकाळी निळ्या नवा मखमली !
चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली !!
पहाट झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली !
चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला घाली !!
Note: All song lyrics published on this website belong to their respective copyright owners. We do not claim any ownership over the content and share it strictly for informational and educational purposes.