| पैलू | माहिती |
|---|---|
| Singer | कृष्णा शिंदे |
| Lyricist | अनिल भारती |
| Music | मधुकर पाठक |
पडली भवानी जेव्हा, म्यानाच्या बाहेरी
रणात फिरली ना ती कधीच माघारी
होssss चमकेsss
शिवबाची तलवार
हो चमके शिवबाची तलवार
तळपत्या बिजलीचा अवतार
झेले ढालीवरती वार
होssss चमकेssssssss
शिवबाची तलवार
पडली भवानी, जेव्हा म्यानाच्या बाहेरी
रणात फिरली ना ती कधीच माघारी
तख्त दौलतीसमोर, केली ना लाचारी
कधी न झुकली ती, दिल्लीच्या दरबारी
तमाम बादशाहीचा, ताज तिने ठोकरला
मराठमोळ्याचा वेष तिने पांघरला
धर्मरक्षणासी सदाss
सज्ज भवानी झाली
जुलुमकर्त्याच्या रक्ताने ती न्हाली
महाराष्ट्रावर प्रेम अपार
उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार
हो ssss चमके ssss
शिवबाची तलवार
शाहिस्तेखान म्हणाला
दिल्ली दरबारी
हुजुर करतो मी
महाराष्ट्रावर स्वारी
पुण्यात शाहिस्ता
वस्तीला मग आला
शिवाजी लागे
अजमावयास शत्रूला
शाहिस्त्याच्या घरात
शिवबा रात्री शिरले
बघुन मर्द शिवा
खान मनी घाबरले
केला शिवबाने गनिमी काव्याने हल्ला
शाहिस्ता बोलतसे
या तोबा या अल्ला
केला शाहिस्त्यावर वार
त्याची तुटली बोटे चार
होsss चमकेsss
शिवबाची तलवार
तेव्हा अफझूलखाना
क्रोध भारी मग चढला
कसम खाउनी घराबाहेरी तो पडला
पहाड का चुहा हे
शिवाजी फिर भी बच्चा
मगर मैं बादशाह का
बंदा हूं सच्चा
बलिष्ट शत्रूला
शिवबाने ओळखले
प्रतापगडाशी स्वत:
भेटीला ते आले
आओ मिलो हम से
म्हणुनी खान भिडे शिवबाला
करून धोका
अफझुल करी वाराला
झाला शिवराया हुश्शार
झाला शिवराया हुश्शार
केला क्षणांत अफझुल ठार
केला क्षणांत अफझुल ठार
होsssss चमके ssss
शिवबाची तलवार
हो चमके शिवबाची तलवार
चमके शिवबाची तलवार
तळपत्या बिजलीचा अवतार
तळपत्या बिजलीचा अवतार
झेले ढालीवरती वार
होsss चमकेssss
शिवबाची तलवार
=============
जय जय भवानी,
जय जय भवानी,
Note: All song lyrics published on this website belong to their respective copyright owners. We do not claim any ownership over the content and share it strictly for informational and educational purposes.


