भीमरावांनी देशावरती प्रेम अलौकिक केले
इतिहासाचे पान सुवर्णी रंगवून ते गेले
गोलमेज ही परिषद हि त्यांनी वाणीने गाजविली
मूलभूत हक्कांची सदनी कैफियत मांडिली
बहिष्कृतांचे दुःख जगाच्या वेशीवर ठेवियले
इतिहासाचे पान सुवर्णी रंगवून ते गेले
प्रतिगामी शक्तींना त्यांनी कडवा विरोध केला
शांतिपथावर रथ क्रांतीचा हाकीत पुढती नेला
तळागाळातील दबलेल्याना पंखगती ती दिधली
इतिहासाचे पान सुवर्णी रंगवून ते गेले
अर्थव्यवस्था या देशाची सुस्थिर भक्कम व्हावी
दारिद्र्याच्या रेषेखालील जनता वरती यावी
स्वप्न गोजिरे भारतभू चे लोचनात रेखियले
इतिहासाचे पान सुवर्णी रंगवून ते गेले