भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले | Bhimrayamule Amha Buddha Milale Song Lyrics

त्रिसरण पंचशीलाचे सूर जुळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले
दिव्य ज्ञानाचा दावूनी प्रकाश
दीन दुबळ्यांचा केला विकास
अज्ञानाचे अश्रू ते दूर पळाले
जीर्ण रुढींच्या जीर्ण चालीरीती
नष्ट केल्या देवून मूठमाती
अंधश्रद्धेचे सारे रान जळाले
साऱ्या ग्रंथांचा करुनी व्यासंग
बुद्ध धम्मात होताचि दंग
मानवाला जीवनाचे महत्त्व कळाले
निर्जीवात या टाकिला जीव
बौद्ध अमृताने केले सजीव
प्रथमा हे जीवन सुमार्गी वळाले
त्रिसरण पंचशीलाचे सूर जुळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले
Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?