नागांच्या त्या नागपुरात
नागांच्या त्या नागपुरात
चंद्रमणी सवे लाखो जनात
त्या दीक्षाभूमीवर
भीमान केलय धर्मांतर…2
त्या दीक्षाभूमीवर
भीमान केलय धर्मांतर…2
मंगल सोहळा दिन सोन्याचा प्रकाशित हा झाला,
लाखो जनाचा दलित मेळा बुद्धा चरणी नेला…2
छप्पन्न साली हर्षभरात…2
चंद्रमणी सवे लाखो जनात,
त्या दीक्षाभूमीवर
भीमान केलय धर्मांतर…2
त्या दीक्षाभूमीवर
भीमान केलय धर्मांतर…।।1।।
येवले ठायी गर्जना केली भीमान धर्मांतराची,
उजाडली ती रम्य पहाट दलित दिक्षांतराची…2
बुध्दाची वाणी गाऊन सुरात…2
चंद्रमणी सवे लाखो जनात,
त्या दीक्षाभूमीवर
भीमान केलय धर्मांतर…2
त्या दीक्षाभूमीवर
भीमान केलय धर्मांतर…।।2।।
आशोकानंतर फीरवीले ते चक्र त्याने धम्माचे,
बुध्दम शरणम मंत्र गायिला दर्शन दीले बुद्धाचे…2
सोन लुटलय घराघरात…2
चंद्रमणी सवे लाखो जनात,
त्या दीक्षाभूमीवर
भीमान केलय धर्मांतर…2
त्या दीक्षाभूमीवर
भीमान केलय धर्मांतर…।।3।।
नागपुरात या जीवनाच सार्थक झाल माझ,
बुध्दा चरणी लीन झाला हर्षादा दील राज…2
घेऊनी ती जिद्द उरात…2
चंद्रमणी सवे लाखो जनात,
त्या दीक्षाभूमीवर
भीमान केलय धर्मांतर…2
त्या दीक्षाभूमीवर
भीमान केलय धर्मांतर…।।4।।
नागांच्या त्या नागपुरात
चंद्रमणी सवे लाखो जनात
त्या दीक्षाभूमीवर
भीमान केलय धर्मांतर…
त्या दीक्षाभूमीवर
भीमान केलय धर्मांतर…


