शतका शतका मधून होतो अपूर्व साक्षात्कार
नव स्वतंत्र भारतात भीमा उजळलास अंधार
करिते रूढी मानवतेचा जेव्हा स्वाहाकार
माणूस म्हणुनी जगण्यासाठी मिळवी फक्त नकार
समानतेचा हवा कायदा
दृष्टी तुझी उदार
नव स्वतंत्र भारतात भीमा उजळलास अंधार
तुझीच प्रतिमा पूजीत असता उमटतात हुंकार
संधी साधून दलित बंधूचा घडविलास उद्धार
जनतेसाठी कष्टलास तू
करुणा तुझी अपार
नव स्वतंत्र भारतात भीमा उजळलास अंधार
शतका शतका मधून होतो अपूर्व साक्षात्कार
नव स्वतंत्र भारतात भीमा उजळलास अंधार