“बुद्ध या देशात 80 वर्षे जगला. या देशात त्याने आपल्या आयुष्याची 45 वर्षे प्रचारात घालविली. आज जशी शंकराचार्याला मोटार आहे तशी त्याच्याजवळ मोटार नव्हती. साधा गाडीघोडाही नव्हता. वाहतुकीचे एकही साधन त्याला उपलब्ध नव्हते. तरीपण देश-कल्याणाकरिता तो जम्मुपासून कन्याकुमारीपर्यंत अक्षरशः पाणी फिरला. बाराशे वर्षांपर्यंत बुद्धधर्म या देशात चालू होता. ज्याने भिक्षा मागून आपले जीवन जगविले, अनंत हाल सोसले, त्याचे नावही या देशात निघत नाही.
केव्हा केव्हा खोट्याचा जय होतो, खर्याचा जय होत नाही. तसाच काहीसा हा प्रकार आहे. पण सर्वांनी ध्यानात ठेवावे की सत्याचाही केव्हातरी जय होईलच. आणि आज ती वेळ आली आहे. बाराशे वर्षांचा धर्म पुनरपि या देशाचा धर्म होईल, अशी माझी खात्री आहे.” ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
दि. १४ जानेवारी १९५१, वरळी, मुंबई येथील बुद्धदूत सोसायटीच्या विद्यमाने भरविण्यात आलेल्या बुद्धमेळ्यात केलेल्या भाषणातून


