जय भीम रे | Jay Bhim Re Song Lyrics

आया बायांनो ध्यानात ठेवा
कष्ट सोसले, सोसले अपार
आया बायांनो ध्यानात ठेवा
कष्ट सोसले, सोसले अपार
केला जीवनाचा, जीवनाचा उद्धार
बाबासाहेबांचे, साहेबांचे उपकार
आया बायांनो ध्यानात ठेवा ।। धृ ।।

पुरुषांच्या बरोबरीनं बाई राबत होती जरी
बाई राबत होती जरी, दिली अर्धीच मजुरी
बाईपनाचं ओझं मिरवून गेलो थकून, थकून साऱ्याजणी
दिला समान, सामान पगार
बाबासाहेबांचे, साहेबांचे उपकार
आया बायांनो ध्यानात ठेवा ।। १ ।।

घर चालवणाऱ्या बाया आता देश हा चालवतात
त्यांच्या कर्तृत्वाच्या कहाण्या साऱ्या जगाला हादरवतात
नका बायांना, बायांना समजू कमी
द्या फेकून डोक्यातली गुलामी
स्त्रीमुक्तीचं, मुक्तीचं वाहतंय वारं
बाबासाहेबांचे, साहेबांचे उपकार
आया बायांनो ध्यानात ठेवा ।। २ ।।

जुन्या रितीरिवाजाप्रमाणं तोंड उघडू नये बाईनं
संम्बदा कारभार चालवलाय पुरुषाच्या दांडगाईनं
माझ्या देशाचं, देशाचं संविधान
दिला माणूस, माणूस म्हणून मान
दिला मताचा, मताचा अधिकार
बाबासाहेबांचे, साहेबांचे उपकार
आया बायांनो ध्यानात ठेवा ।। ३ ।।

बाई आधी मी माणूस व्हावं
सांगितलंय माझ्या भीमानं
ही मानवतेची नीती शिकविली बुद्ध धम्मानं
अर्थ येईल जगण्याला बाई
घे सोबतीला भीमाची पुण्याई
बुद्ध धम्माचं, धम्माचं ऎका सार ~~ २
बाबासाहेबांचे, साहेबांचे उपकार
आया बायांनो ध्यानात ठेवा ।। ४ ।।