ऐ भावा.. माझा जयभीम घ्यावा | A Bhava Majha Jay Bhim Ghyava Song Lyrics

घटक माहिती
Singer Adarsh Shinde
Lyricist Tejas Alhat
Music By Adarsh Shinde & Utkarsh Shinde
Release Bhava Jay Bhim Ghyava – Single (2021)

सगळ्यांना मानाचा, आदराचा, स्वाभिमानाचा,
निळा, कडक, क्रांतिकारी जयभीम

माझ्या भीमाची जयंती आली, साऱ्या जगात चर्चा झाली
माझ्या भीमाची जयंती आली, साऱ्या जगात चर्चा झाली

आला अंगात नाचाया जोश, घराघरात भीम जल्लोष
लय रुबाब खास, निळ्या झेंड्याचा बॅास,

भर चौकात आमचीच हवा
ऐ भावा.. माझा जयभीम घ्यावा

मान सन्मानाचा अभिमानाचा
स्वाभिमानाचा घ्यावा
ऐ भावा.. माझा जयभीम घ्यावा

भर चौकात ढोल अन् ताशा तो वाजे
भीमगर्जना दाही दिशांना गाजे,

भर चौकात ढोल अन् ताशा तो वाजे
भीमगर्जना दाही दिशांना गाजे,

भीम अनुयायी मी भाग्य थोर हे माझे
भीम सैनिक हा जय भीम घोषानं साजे,

माझ्या घासात भीम अन् श्वासात भीम
भीम विचारांचा मी छावा,

माझ्या घासात भीम अन् श्वासात भीम
भीम विचारांचा मी छावा,

ऐ भावा… जयभीम घ्यावा
मान सन्मानाचा अभिमानाचा
स्वाभिमानाचा घ्यावा
ऐ भावा.. माझा जयभीम घ्यावा

निळा झेंडा तो डौलत फडफड फडके
भीम दिवाना रंगात नाचतोय हटके,

निळा झेंडा तो डौलत फडफड फडके
भीम दिवाना रंगात नाचतोय हटके,

ज्ञानदिवस हा जातिवाद्याला खटके
नाद घुमणार, घुमणार शंभर टक्के,

मझ्या ध्यासात भीम इतिहासात भीम
भीम आदर्श जगानं घ्यावा

मझ्या ध्यासात भीम इतिहासात भीम
भीम आदर्श जगानं घ्यावा
ऐ भावा, जय भीम घ्यावा

मान सन्मानाचा अभिमानाचा
स्वाभिमानाचा घ्यावा
ऐ भावा.. माझा जयभीम घ्यावा