जातीय अत्याचाराच्या प्रकरणात पुरावे व्यवस्थित जतन करणे अत्यंत महत्त्वाचे असते. केवळ आरोप न करता घटना सिद्ध करण्यासाठी उपलब्ध तथ्ये, साक्षीदार आणि दस्तऐवजी/इलेक्ट्रॉनिक पुरावे सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे.
कोणते पुरावे जतन करावेत?
- Audio/Video: घटना रेकॉर्ड झाल्यास मूळ फाइल जतन करा.
- CCTV: जवळच्या दुकान, सोसायटी, रस्ता किंवा संस्थेतील CCTV उपलब्ध असल्यास त्याबाबत त्वरित माहिती द्या.
- WhatsApp/Social Media Screenshots: Screenshot सोबत शक्य असल्यास मूळ chat, profile, URL आणि तारीख/वेळ जतन करा.
- साक्षीदार: प्रत्यक्ष घटना पाहिलेल्या व्यक्तींची नावे व संपर्क माहिती सुरक्षित ठेवा.
- दस्तऐवज: जमीन, मालमत्ता, नोकरी, शाळा, ग्रामपंचायत किंवा इतर वादाशी संबंधित कागदपत्रे जतन करा.
- वैद्यकीय कागदपत्रे: मारहाण किंवा दुखापत असल्यास संबंधित वैद्यकीय नोंदी जतन करा.
पुराव्यात बदल करू नका
फोटो/व्हिडिओ edit करून फक्त छोटा भाग ठेवण्यापेक्षा मूळ फाइल सुरक्षित ठेवणे चांगले. इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या बाबतीत त्यांच्या मूळ स्वरूपाचे आणि उपलब्ध metadata चे संरक्षण महत्त्वाचे असू शकते.
घटना लगेच लिहून ठेवा
घटना घडल्यानंतर तारीख, वेळ, ठिकाण, उपस्थित व्यक्ती, वापरलेले शब्द आणि त्यानंतर झालेल्या घटनांची chronological नोंद तयार करा.
कायदेशीर मार्गदर्शनासाठी संपर्क:
Adv. Premsagar Gavali
मो.: 7710932406
टीप: कोणता पुरावा ग्राह्य ठरेल आणि त्याचे evidentiary value काय असेल हे न्यायालयीन प्रक्रियेत संबंधित कायदे व तथ्यांवर अवलंबून असते.


