अट्रोसिटी कायदा ..!

अट्रोसिटी हा कायदा जरी 1990 ला अमलात आला तरीही त्याची तरतूद सुरवातीच्या काळातच घटनेत करून ठेवलेली होती,,1990 ते आता पर्यंतच्या कालावधीचा हिशोब लावला तर हा अतिशय अल्प काळ झाला,,भारतात हजारो वर्षे सवर्णांनी अस्पृश्य आणि हीन वर्णीयांवर अत्याचार केलेले आहेत,,पिढ्या न पिढ्या अनीसुचितांनी व इतर सर्व बहुजन दलित समाजाने जनावारांपेक्षा बत्तर जीवन काढलेले आहे,,

26 जाणे 1950 ला संविधान लागू झाले आणि जातीप्रथा नष्ट करण्यात आली,,परंतु सावर्णना हि गोष्ट पचतच नव्हती की हिंवर्णीयांना सामान दर्जा दिला जावा,,त्यांच्यावरचे अत्याचार कमी होतच नव्हते,,अत्याचार हे सर्व प्रकारचे,,त्यात मनुष्यवधापासून तर बलात्कार पर्यंत सगळेच अत्याचार शामिल आहेत,,म्हणून हा कायदा कठोर करण्यात आला,,त्यामुळे थोड्या प्रमाणात परिस्थिती कंट्रोल मध्ये अली होती,,,

परंतु अजूनही बऱ्याच गावांमध्ये जातीप्रथेच्या नावाखाली अत्याचार चालूच आहेत,,त्या साठी हा कायदा कठोर जुने खूप गरजेचे आहे,,आणि ज्यांना असे वाटते की खोटे गुन्हे दाखल होतात त्यांनी ते सिद्ध करावे,,कोणी तरी बोलताय म्हणून सगळे बोलतात कि खोटे गुन्हे दाखल होत आहेत,,कोणालाही पक्के माहित नाही नेमका कुठे आणि केंव्हा खोटा अट्रोसिटी दाखल झाला,,,

आपले मत मंडण्या आधी पूर्ण अभ्यास करावा,,,आणि जर छोट्याश्या भांडणात जातीचा उल्लेख झाला तरी गुन्हा दाखल करतात हि गोष्ट पटत नसेल तर मला काळातच नाही की जातीचा उल्लेख मुळात करताच कशाला,,,,भारतात अनेक गुन्हे घडतात आणि खुन्यांपासून तर बलात्कारी निर्दोष सुटतात,,,आणि बऱ्याच ठिकाणी सदोष पुरावे सापडल्याने निर्दोष व्यक्तीलाही शिक्षा होते,,ती एक न्यायालयीन प्रक्रिया आहे पण तिथे कोणी दखल देत नाही,,अट्रोसिटी वरच का सगळे एवढा अभ्यास करायला लागले आणि त्यात काय करायला पाहिजे काय नाही हे शिकवायला लागले,,,,

म्हणजे एवढे बलात्कार व्हायला लागले तेही मंदिरात,,,एवढे हत्याकांड व्हायला लागले पण सगळ्यांचं लक्ष अट्रोसिटी वरच का केंद्रित आहे??? जर हे मान्य करता कि जातीप्रथा नष्ट झाली पाहिजे तर प्रत्येकाने काळजी घ्यायला पाहिजे की जातीच्या नावाने कोणालाही त्रास देणे बंद झाले पाहिजे,,,जर असे पुरोगामी विचार जोपासले तर जातीवरून भांडणे होणारच नाहीत,,,पण तरीही तुम्हाला अट्रोसिटी मान्य नाही म्हणजे तुम्हाला समता मान्य नाही,,

म्हणजे अजूनही तुम्ही जातीप्रथेतून बाहेर यायला तयारच नाही,,अजूनही तुम्हाला हिन वर्णीयांना सामान प्रवाहात घ्यायचंच नाही,,,,,आणि जर अट्रोसिटी ने पाकिस्तान तयार होऊ शकतो तर मंदिरात होणाऱ्या बलात्काराने,,चिमुरड्यांवर होणाऱ्या बालात्कारणे,,गोरक्षणाच्या नावाखाली होणाऱ्या हत्याकांडांने,,,जातिवादातून होणाऱ्या दंगलींनी काय भारताचा स्वर्ग होताना दिसत आहे का????

का सगळे अट्रोसिटी वरच अभ्यास करतात??? पिढ्यान पिढ्या झालेल्या शोषणाच्या तुलनेत गेल्या 70 वर्षात मिळालेले आरक्षण आणि जातीप्रथा मोडण्या साठी अमलात आलेला 28 वर्षांपूर्वीचा अट्रोसिटी ऍक्ट खूप कमी आहे,,,,तो हि डोळ्यात सलायला लागला,,,एवढ्यात सगळ्यांना खटकायला लागले,,तर विचार करा आमच्या पूर्वजांनी पिढ्या घालवल्या नरक भोगतांना,,

किमान तुमच्यावर हि वेळ तर नाही अली ना??? बोलणे खूप सोपे आहे ,,कि अट्रोसिटी बंद झाला पाहिजे ,,,, आरक्षण बंद झाले पाहिजे,,पण प्रत्यक्षात तुम्ही ते काहीच सहन केलेले नाही म्हणून तुम्हाला त्याची जाणीव नाही.. हि सत्यता आहे की जर भविष्यात अट्रोसिटी पूर्ण रद्द झाला तर भारताचा सिरिया व्हायला वेळ लागणार नाही,,,कोणालाही अट्रोसिटी वर ज्ञान वाटायची गरज नाही,,,,जर तज्ज्ञांनी तो कायदा तयार केला आहे तर आपण त्यांच्या पेक्षा हुशार नाही,,,-

–जयश्री जाधव

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?