चतुर शिष्यच सुदेशित धम्म ग्रहण करील

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_चतुर शिष्यच सुदेशित धम्म ग्रहण करील_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

 *_को इमं पठविं विजेस्सति यमलोकञ्च इमं सदवकं ।_*

 *_को धम्मपदं सुदेसितं कुसलो पुप्फमिव पचेस्सति ॥_*

*_अर्थ – या पृथ्वीला आणि देवलोकासहीत यम लोकाला कोण जिंकेल ? सुन्दन रीतीने उपदेशिलेल्या धर्मपदाला कोण कुशल पुरुष पुष्पाप्रमाणे वेचिल._*

_पाचशे भिक्षु जनपदाच्या चारिकेवरून परतून सायंकाळी जेतवनाच्या आसन शाळेत बसून आपल्या प्रवासातील प्रदेशातील पृथ्वी सम्बन्धी बोलत होते. – ” तेथील पृथ्वी काळी आहे, तेथील पृथ्वी पिवळी आहे.” इत्यादी… तथागतांनी येऊन चर्चेच्या विषयासंबंधी विचारले – “भिक्षुंनो ! ही बाह्य पृथ्वी आहे, तुम्ही सर्वांनी आध्यात्मिक पृथ्वीत परिकर्म करावयास पाहिजे.” असे म्हणाले व ह्या दोन गाथा सांगितल्या._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन – महेश कांबळे_*

*_दिनांक :-३०/०३/२०२४_*

*_संदर्भ :-_*

_*१) धम्मपद – पुप्फवग्गो,_*

_*२) धम्मपद – गाथा आणि त्यांच्या अट्ठकथा*_

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼