परियत्ती संडे धम्म स्कूल

परियत्ती संडे धम्म स्कूल समुहातील सर्व सदस्यांना #सविनय_जयभीम!

गाव/वाडी/विहार तीथे परियत्ती संडे धम्म स्कूल ह्या संकल्पनेतून गावोगावी संस्कारवर्ग सुरू होण्याच्या दृष्टीने आम्ही *रत्नागिरी टिम परियत्ती* कार्यशील आहोत. धम्माप्रती कर्तव्य भावनेतून गावोगावी जाऊन प्रचार प्रसार करित आहोत. आजपर्यंत साठ पेक्षा अधिक गावांमधे #परियत्ती_संडे_धम्म_स्कुल धम्मसंस्कारवर्गाची गरज* या संदर्भाने *बालसंगोपन व बालसंस्कार या विषयी मानसशास्त्राच्या अंगाने* पालकांकरिता प्रबोधनसत्र घेतले आहे. यांतील किमान पन्नासचे वर गावांमधे परियत्तीचे संस्कारवर्ग नित्य सुरू झाले आहेत.
गावातील/ वाडितील सुज्ञ व धम्माप्रती आस्था असणार्या धम्मबंधूूभगिनींना वर्ग घेण्यास व त्यात सातत्य ठेवण्यास प्रवृत्त केले आहे. सदर धम्मशिक्षकांकरिता तज्ञ मार्गदर्शकांकरवी कार्यशाळा आयोजित करून त्यांचे मनोबल वाढविणे व दर्जा, नाविन्य, सातत्य राखण्याचा आपण सातत्याने प्रयत्न करित आहोत.
लवकरच परियत्तीचे किमान शंभर संस्कार वर्ग करण्याचा आमचा मानस आहे.
बंधुभगिनीनो आपल्याही जिल्ह्या/ तालुका/ गावांमधे परियत्तीचे संस्कार वर्ग सुरू करून बाबासाहेबांना अपेक्षित #प्रबुद्ध_भारताप्रती वाटचाल करूया.
आपली उद्याची पीढी नितीमान व प्रगत बनविण्यासाठी, सुदृढ समाज निर्मितीसाठी आपण सारेच कटीबद्ध होऊ असा आशावाद व्यक्त करतो.

#चलो_बुद्ध_की_ओर..*

टिम परियत्ती करिता
सुगत शान्तेय
9561083358
महानाग रत्न
9422986954
विवेक घाटविलकर
9860386322

*नमो बुद्धाय! जयभीम! प्रबुद्ध भारत!*

🌹🌹🌹🌹🙏🏽🙏🏽🙏🏽🌹🌹🌹🌹

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?