धम्म आचरणासाठी 22 सम्यक संकल्प

1)तुम्ही तुमच्या घरी दररोज बुद्ध वंदना घेतली पाहिजे.कारण घरातील लहान मुलावर योग्य वयात धम्माचे संस्कार होतील.मुलांना आपल्या खऱ्या आदर्शाची ओळख होईल व त्यांना भविष्यात आदर्श माणुस बनन्याची ईच्छा होईल.परिवारात कोणीही कधीही व्यसन करणार नाही
2)तुम्ही प्रत्येक रविवारी सहपरिवार बुध्द विहारात गेले पाहिजे. कारण तुमच्या परिवाराला धम्म आचरण समजेल. व त्यामुळे समाज एकसंघ होईल.
3)तुम्ही प्रत्येक अष्ठमी,पौर्णिमेला सहपरिवार उपोसथ केल्याने काया, वाचा व मनाने धम्म आचरण करण्याची सवय लागेल. व त्याचे प्रत्यक्ष लाभ मिळतील.
4) वर्षावासात घरी बुध्द आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन केल्याने धम्म अधिक विस्ताराने कळायला मद्त होईल.व तुमच्या परिवाराला धम्माचे महत्व समजेल.
5) तुम्ही दहादिवस श्रामणेर शिबिर केल्याने तुम्हाला धम्म विनय समजतील. व तुमच्या व्यक्तीमत्वाचे सौंदर्य अधिकच खुलेल.
6)तुम्ही विपश्यना ध्यान साधना शिबिर केल्याने चित्त(मन)शुद्ध कसे करावे हे कळेल.संयम, समंजसपणा ,एकाग्रता,सकारात्मकता वाढेल.
7)तुम्ही धम्म कार्यासाठी वेळ, श्रम,आर्थिक दान दिल्याने तुमची धन कमावण्याची शक्ती अधिक वाढेल.
8)तुम्ही धम्म कार्य करणाऱ्या कोणत्याही संस्थेशी जोडल्याने तुम्हाला वारंवार धम्म प्रवचने, शिबीरे,प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होईल.
9)तुम्ही नियमित बौध्द साहित्य वाचन केल्याने तुम्हाला धम्माचे तत्व समजतील. व तुमच्या ज्ञानामध्ये अधिक भर पडेल.
10)तुमच्या घरामध्ये पुजास्थान असल्याने तुमच्या घरामध्ये नियमित शांतता, प्रसन्नता व सुख जाणवेल.
11)तुम्ही भिक्खूला स्वतः च्या निवास्थानी आमंत्रित केल्याने धम्म आचरण कळेल. भिक्खूला भोजनदान, चिवरदान व इतर दानकर्म केल्याने पुन्यकर्म संचित होईल.जे पुण्यकर्म तुम्हचे आपत्ती विपत्ती पासून रक्षण करेल.
12)तुम्ही बौद्ध सण,उत्सव साजरे केल्याने तुमची ओळख इतराना बौध्द म्हणून होईल.तुमच्याकड़े लोक आदर्श बौद्ध म्हणूनच पाहतील.
13)तुम्ही बुध्द पर्यटन स्थळी गेल्याने बौध्द धम्माविषयी श्रद्धा वृद्धिंगत होईल.व धम्मातिल सर्व सत्य अनुभव मिळेल.
14)तुम्ही नियमित धम्म प्रशिक्षण शिबिरात गेल्याने तुमचे धम्म ज्ञान वाढेल. तुम्हाला देखील धम्म प्रचार प्रसार कार्य करण्याची आंतरिक प्रेरणा जागेल.
15)तुम्ही नियमित बौद्ध धम्म प्रचार करणाऱ्या प्रचारकांच्या संपर्क ठेवल्याने तुम्हाला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन मिळेल.संकटात व दुःखा एकटे वाटणार नाही.मानसिक आधार मिळेल.
16)सोशल मीडिया किंवा वर्तमानपत्र,मासिके वरील धम्म संबधित माहिती वाचून संग्रही ठेवल्याने आपल्याला अधिक ज्ञान मिळेल.
17)तुम्ही धम्माच्या कोणत्याही कार्यक्रमात उपस्थित राहून सहभाग घेतल्याने अनेक विद्वान,अभ्यासक,ज्ञानी व्यक्तीचे विचार ऐकायला मिळतील. त्यामुळे ज्ञानात भर पडेल. त्यांच्या प्रमाणे आपण देखील ज्ञानी व्हावे अशी इच्छा होईल.
18)तुम्ही धम्म प्रचार प्रचार करणाऱ्या कोणत्याही व्यक्तिस आचार्य,गुरुजी मानल्याने वेळोवेळी गुरुजीचे मार्गदर्शन मिळेल.
19)धम्माला जीवनात प्रथम स्थान दिल्याने तुम्हाला तिन शाश्वत सुख लाभतील. ते म्हणजेच दीर्घायुष्य, निरोगी स्वास्थ्य व धम्मधर संतान.
20)बुध्द धम्म संघ यांचे श्रेष्ठत्व मानल्याने सत्य सदा रक्षण करेल.
21)बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा त्याग न विसरल्याने त्यांच्या त्यागातून जिवन जगण्याची उर्मी निर्माण होईल.
22)बौध्द म्हणून घेतल्याने आपला स्वाभिमान सदा जागृत राहील. व बौध्द जनसमुदाय म्हणून एक संघ शक्ती आपल्या नेहमीच सोबतीला तयार होईल.
धम्म बंधु आणि भगिनीनो,
जे बौध्द बांधव वरील 22 सम्यक संकल्प आपल्या जीवनात प्रत्यक्ष उतरवतील त्यांना धम्माच्या खऱ्या सुखाचा तत्काल लाभ मिळेल.
आपण देखील स्वतः ला व स्वतः च्या परिवाराला, नातेवाईकांना देखील धम्ममार्गावर चालण्यासाठी प्रेरीत करा.व धम्मामध्ये स्थापित होवून स्वतःची उन्नती करा.सर्वाना आश्विन पौर्णिमेच्या हार्दिक मंगल कामना
*आपल्या सर्वांचे मंगल होवो* !
✍️आयु.मिलिंद बनसोडे
(बौद्धाचार्य),नाशिक
मो.9960320063
(धम्म प्रचारार्थ हेतू हा संदेश इतर ग्रुपवर अवश्य शेअर करावे)
Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?