जहाली पहाट उठ शिंप सडा माउले
दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले ।।२।।
बुद्धं शरणं गच्छामि
धम्मं शरणं गच्छामि
संघ शरणं गच्छामि
रंगली ती पूर्व दिशा दिनचर्या कर सुरु
आगमनात जहाल तुझ्या गुरुचे सद्गुरू
चिमण्या पाखराचे साद गीत गायिले
दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले ।।२।।
बुद्धं शरणं गच्छामि
धम्मं शरणं गच्छामि
संघ शरणं गच्छामि
भिक्खू संघ साथीला, प्रशांत चित्त चालती
बुध्द नाम एक मुखे सुस्वरात बोलती
हर्ष भरे जागली वसुंधरेची
दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले ।।२।।
बुद्धं शरणं गच्छामि
धम्मं शरणं गच्छामि
संघ शरणं गच्छामि
भन्ते भदंताचे पहा शुध्द स्नान संपले
सुगंधमय उपासकीने पुष्पहार गुंफले
कुंकवाचे जागी त्यांनी अष्टगंध लाविले
दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले ।।२।।
बुद्धं शरणं गच्छामि
धम्मं शरणं गच्छामि
संघ शरणं गच्छामि
अथांग दिव्य पाहुनी , निसर्ग श्रुष्टि पावली
तथागतांच्या शिरी केली पिंपळाची सावली
त्या सावलीत काशीनंदा विश्व हे सामावले
दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले ।।२।।
बुद्धं शरणं गच्छामि
धम्मं शरणं गच्छामि
संघ शरणं गच्छामि
दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले ।।२।।
जहाली पाठ उठ शिंप सडा माउली
दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले ।।२।।
बुद्धं शरणं गच्छामि
धम्मं शरणं गच्छामि
संघ शरणं गच्छामि


