| पैलू | माहिती |
|---|---|
| Singer | Vaibhav Khune |
| Lyricist | Ram Janrao |
| Music Composer | Milind Mohite |
| Album / Release | Single (Releasing on Apple Music – 20 April 2023) |
झाला असता टाटा बिर्ला
धनवान तो राजा ।।२।।
समाजात नित्य झिजला
भीमराव माझा ।।२।।
co समाजात नित्य झिजला
भीमराव माझा ।।२।।
किती आले ते धर्म पंथी
बाबांना करे विनंती
घ्या ट्रका भरून पैसा आमच्या धर्मा अँटी
तुमच्या आव्हानांचा ऐकला गाजावाजा
समाजात नित्य झिजला भीमराव माझा ।।२।।
co समाजात नित्य झिजला
भीमराव माझा ।।२।।
तुझ्या माझ्या सर्वांसाठी
त्यागिले ते डॉलर कोटी ।।२।
ते म्हणाले परदेशीवाले
न्या दोन भरून बोटी ।।२।।
वदे भीम नको हा तुमच्या पापाचा रे बोजा
समाजात नित्य झिजला भीमराव माझा
co समाजात नित्य झिजला
भीमराव माझा ।।२।।
नाही सुटला स्वार्थ त्याला
ना कुणा त्या आहारी गेला
पण तुमच्याच साठी आला
आणि परत निघून गेला.
कधी नाही काळल्या त्याला सुख आणि त्या मौजा
समाजात नित्य झिजला भीमराव माझा ।।२।।
घ्या इमान घ्या इमान,
नका होऊ असा बेईमान ।।२।।
थेंब थेंब रक्त भीमाचे
तुम्हा साठी गेले जळून ।।२।।
नको जानराव नको जानराव, सोडू शील आणि रिवाजा
समाजात नित्य झिजला भीमराव माझा ।।२।।


