| घटक | माहिती |
|---|---|
| गीत | Nila Dhurula (निळा धुरुळा) |
| गायक | Vaibhav Khune (वैभव खूणे) |
| गीतकार | Rajesha Nanaware (राजेश नानावरे) |
| संगीत | Milind Mohite (मिलिंद मोहिटे) |
| ओळी | “डौलानं फडकतो झेंडा तो निळा तेव्हा उडतो धुरळा” |
आमचा नादच खुळा
साऱ्या जगा विरळा ।। २ ।।
डौलानं फडकतो झेंडा तो निळा
तेव्हा उडतो धुरळा
डौलानं फडकतो झेंडा तो निळा
तेव्हा उडतो धुरळा ।।२ ।।
बाप आमचा वाघ
आमची वाघाची औलाद
आरं मर्दाची छाती
आमच मनगट पौलाद
बघुन आम्हा जातीवादी कापती चळचळा
डौलानं फडकतो झेंडा तो निळा
तेव्हा उडतो धुरळा
आरं भीम छावे आम्ही
नादी लागू नका कोणी
भीम शक्तीचे रे तुम्हा
पाजु आम्ही पाणी
बोट जर कराल
करू हातच लुळा
डौलानं फडकतो झेंडा तो निळा
तेव्हा उडतो धुरळा
निळा झेंडा आहे
आमच एकीचे निशाण
त्याकडं बघंल कुणी वाकड्या नजरेनं
डोळे बाहेर काढू त्याला करू अंधळा
तवा उडतो धुरळा
डौलानं फडकतो झेंडा तो निळा
तेव्हा उडतो धुरळा
ध्येय आहे आमचं ते संसद भवन
भवाना वरती फडकीवण्या निशाण
येईल राजेश स्वप्न भीमाचे फळा
डौलानं फडकतो झेंडा तो निळा
तेव्हा उडतो धुरळा
डौलानं फडकतो झेंडा तो निळा
तेव्हा उडतो धुरळा
Note: All song lyrics published on this website belong to their respective copyright owners. We do not claim any ownership over the content and share it strictly for informational and educational purposes.


